किहिम सागरकिनारा

रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ असणारा किहिम सागरकिनारा नितांतसुंदर आहे. या किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि उन्हात चमकणाऱ्या पाण्याच्या लाटा पुढचे अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. किनाऱ्यावरील डोलणारी नारळाची झाडे मनाला फार आनंद देतात. हा किनारा तरुण, वृद्ध, दांपत्य, कुटुंब आणि मित्र-मैत्रिणी या सर्व वयोगटांसाठी मोठे आकर्षण आहे.

येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे चित्र फार छान दिसते. सूर्यस्नानाबरोबर येथे पोहोण्याचाही आनंद घेऊ शकता. जलक्रीडेसाठी येथे भरपूर साधने आहेत. पॅराग्लायडिंग, बोटिंग आणि इतर राइड्स येथे आहेत. हा समुद्रकिनारा म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. बुलबुल, ऑरेंज-हेडेड थ्रश, ग्रीन बी-ईटर्स, मैना आणि आशियाई कोएल, प्लम असे अनेक विदेशी पक्षीसुद्धा येथे पाहता येतात. येथे स्वादिष्ट अन्नपदार्थांचाही मस्त आस्वाद घेऊ शकता.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
13,396 वेळा पाहिलं