कोरलाई किल्ला

महाराष्ट्रात रायगडमध्ये पोर्तुगीज वसाहती वास्तुकला दाखविणारा कोरलाई किल्ला आहे. पोर्तुगीज या किल्यारावरुन कोरलाई ते बासीनपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रांताचे रक्षण करू शकत होते.  हा किल्ला 2,828 फूट लांब असून त्याची सरासरी रुंदी ४९ फूट आहे. किल्यालात अकरा दरवाजांनी प्रवेश केला जातो.   किल्ल्यातील भाग तीन तटबंदीमध्ये विभागलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी गडप्रेमी तसेच इतिहासप्रेमी आवर्जून भेट देतात.

 या टेकडीचा माथा देखील बुरुजांनी बांधलेला आहे.  येथे पावसाच्या पाण्याचे मोठे टाके आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील आणि चॅपलमधील वेदीवरचे इतर शिलालेख जीर्ण झाले आहेत.   मराठा राजवटीत काही बुरुजांची नावे बदलण्यात आली होती.

हा किल्ला मे 1680 मध्ये बांधून पूर्ण झाला असल्याचे समजते.  येथे रस्त्याने सहज पोहोचता येते. पश्चिमेकडील प्रवेशद्वार हा जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असून तो दीपगृहाच्या बाजूने आहे. काही पायऱ्या चढून गडाच्या मध्यभागी पोहोचता येते.  पावसाळ्यात या मार्गाची शिफारस केली जात नाही. हा मार्ग कमी वापरला जातो. येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक रोहा हे  हे आहे. ते किल्ल्यापासून 42 किमी. अंतरावर आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,058 वेळा पाहिलं