मोचेमाड समुद्रकिनारा

मोचेमाड हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. अत्यंत मनमोहक असा हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून लांब आहे. या किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या आहेत. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्‍याबरोबरच पांढरीशुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे.

या परिसरात किनार्‍यांवरील लाटा व सागरी वारे यांच्यामुळे नैसर्गिक वाळूच्या भिंती तयार झालेल्या असून त्याचा उपयोग वाळूवरील ‘स्केटींग’ या क्रिडाप्रकारासाठी करता येण्यासारखा आहे. हा किनारा शांत असून गजबजाटापासून फार दूर आहे. मनाला प्रसन्नता देणारा हा किनारा निसर्गरम्यतेचा सुखद अनुभव देणारा आहे. स्वच्छ पाणी, शांत परिसर यामुळे एकदा गेलेला पर्यटक पुन्हा येथे आवर्जून जातोच.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
863 वेळा पाहिलं