सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात असलेला उभादांडा सागरेश्वरचा किनारा फार देखणा आहे. शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेले हे रम्य सागरतीर पाहताक्षणी मन वेधून घेते. येथे शांत बसून समोरचा निळाशार समुद्र पाहण्यासाठी छानपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे.

हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथील वाळूत असलेल्या खरखरीत शिंपल्यांनी पायांना छान मसाज होतो. त्यातील एखाद्या टोकदार तुकड्याने पायाला जखमही होऊ शकते. त्यामुळे चालताना काळजी घ्यावीच लागते. मखमली वाळूवरून चालताना दूरवर पलीकडे वेंगुर्ल्याचे दीपगृह दिसू लागते. पायाखालची वाळू लाटा खेचू लागतात.

तोल सांभाळत वाळूवर उभे राहण्याची गंमत अनुभवता येते. याठिकाणी किनाऱ्यावर चटपटीत भेळ, चायनीज पदार्थ, इतर खाऊ विक्रेते असल्याने खाता-खाता मस्त कलंदर लाटा पाहता येतात. वेंगुर्ला बंदर आणि किनाऱ्यावरील पुळण येथून दिसते. येथे प्राचीन सागरेश्वर मंदिर असून तेसुद्धा पाहण्यासारखेच आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
692 वेळा पाहिलं