शनिवारवाडा

पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा आजही दिमाखात असून लोकप्रिय आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही वास्तू असून हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली या वास्तुची पायाभरणी केली. सन् १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. नोव्हेंबर १८१७ मध्ये शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. या वाड्यात एक सातमजली व सात खणी इमारत होती. सन् १८२८ साली या वाड्याला भीषण आग लागून त्यात सर्व वास्तू जळून खाक झाल्या.सध्या वाड्यात मुख्य दरवाजा व बुरुजांच्या भिंती अस्तित्वात आहेत.

दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा, इ. महत्त्वाचे दरवाजे आहेत. आरसे महाल, श्रीमंत पेशव्यांची बैठक, पाण्याचा हौद, सदाशिव भाऊंचे निवासस्थान, हजारी कारंजे, दिवाणखाना, पागा कार्यालय, रंगमहाल तसेच इमारतींच्या पायांचे अवशेष येथे पाहण्यास मिळतात. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्याबाहेर समोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे. शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,143 वेळा पाहिलं