टिपेश्वर अभयारण्य

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे मनसोक्त दर्शन घडविणारे टिपेश्वर अभयारण्य आहे. मुख्यालयापासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर ही अभयारण्य आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. येथील ‘तिपाई’ देवीच्या नावावरून या अभयारण्याला ‘टिपेश्वर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर हे तिपाईचे मंदिर आहे. हे अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे.

या अभयारण्यात पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. वाघांसोबतच अस्वल, चांदी अस्वल, नीलगाय, रोही, सांबर, चितळ, काळवीट, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, सायाळ, काळतोंड्या माकड, रानमांजर, खवले मांजर इत्यादी प्रकारचे प्राणीसुद्धा येथे आढळतात. याशिवाय मोर, हरीयाल, पोपट, गरूड, घार, गिधाड, ससाणा, घुबड, तीतर, पानकोंबडी इत्यादी प्रकारचे पक्षीही मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.

वनस्पतींचा विचार करता साग या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. नीम, भुईनीम, बेल, वड, पिंपळ, बेहाळा, चंदन, पळस, खैर, धावडा, सालई, अंजन, आवळा, चिंच, बोर, जांभुळ इत्यादी प्रकारच्या वृक्षांसह मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही येथे मुबलक प्रमाणात आहेत.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
660 वेळा पाहिलं