
चंद्रपूरमधील महाकाली मंदिर हे ताडोबातील एक प्रेक्षणीय धार्मिक स्थळ आहे. हे चंद्रपूर शहराचे भूषण आहे. महाकाली मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी विशेष गर्दी असते. महाकाली मंदिरात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मागील प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि हनुमान मंदिर आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर पूजेचे समान मिळणारी छोटी दुकाने आहेत. याशिवाय मागच्या दरवाज्याजवळ शनिमंदिर आहे. ताडोबात गेल्यावर या मंदिरास अवश्य भेट द्यावी.
विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर आहे. या महाकाली देवीचे संदर्भ स्कंदपुराणातही आढळतात. मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो. वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात. हे गुंफा मंदिर आहे. रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य आहे.
चंद्रपूरच्या महाकाली मंदिरात दोन मूर्ती सापडतात. दरवर्षी एप्रिलमध्ये येथे जत्रा भरते. राज्यातील अनेक भाविक महाकाली मंदिरात येतात. मंदिर व्यवस्थापन हाताळण्यासाठी आता ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत, मंदिराच्या सुविधांमध्ये लक्षणीय नूतनीकरण झाले आहे. दूरवरच्या भागातून येणाऱ्या यात्रेकरूंना मंदिराजवळ राहण्यासाठी मोकळी जागा मिळावी यासाठी मंदिर प्रशासनाने धर्मशाळा बांधली आहे.