रेल्वे पाटणा साबरमतीसह विशेष गाड्या चालवणार

भारतीय रेल्वेने उन्हाळ्यातील प्रवासी गर्दी लक्षात घेऊन साबरमती गुजरात ते पाटणा बिहार दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिनांक 4 जून 2025 पासून सुरू होणार असून, प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि थेट प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

ही ट्रेन पाटणा आणि साबरमती दरम्यान धावेल. ट्रेन क्रमांक ०९४५७ साबरमती-पाटणा विशेष ट्रेन जूनमध्ये दर बुधवारी साबरमतीहून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल. ही ट्रेन गुरुवारी रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनी  बक्सरला पोहोचेल. शुक्रवारी दुपारी दीड वाजता  आरा आणि दानापूर मार्गे पटनाला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, ०९४५८ पटना-साबरमती विशेष गाडी दर शुक्रवारी पाटणाहून पहाटे साडे चार वाजता सुटेल. ती सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी बक्सरला पोहोचेल. शनिवारी दुपारी अडीज वाजता जयपूर आणि अजमेर मार्गे साबरमतीला पोहोचेल.

या गाड्या विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी चालवण्यात येत आहेत. प्रयागराज जंक्शनसह विविध प्रमुख स्थानकांवर या गाड्या थांबतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. या विशेष गाड्यांमुळे गुजरात आणि बिहारमधील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, थेट आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रवासाची योजना आखताना या गाड्यांचा लाभ घ्या.