फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी

फ्रान्स सरकारने दिनांक १ जुलै २०२५ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर व्यापक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश मुलांना तंबाखूच्या धोक्यांपासून संरक्षण देणे आणि धूम्रपानाच्या सामाजिक स्वीकारार्हतेला कमी करणे आहे.

समुद्रकिनारे, उद्यानं आणि सार्वजनिक बागा, शाळांच्या परिसरात आणि प्रवेशद्वाराजवळ, बस थांबे, खेळाच्या मैदानी सुविधा या ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांना सुमारे बारा हजार दंड ठोठावला जाईल. तथापि, कॅफेच्या बाहेरील टेरेस आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स या बंदीच्या कक्षेत येणार नाहीत.

आरोग्य मंत्री कॅथरीन व्हॉट्रिन यांनी सांगितले की, “जिथे मुले आहेत, तिथे तंबाखूला स्थान नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “धूम्रपान करण्याचा स्वातंत्र्य तेथे संपतो, जिथे मुलांना स्वच्छ हवा श्वास घेण्याचा अधिकार सुरू होतो.”

फ्रान्समध्ये दरवर्षी तंबाखूशी संबंधित आजारांमुळे सुमारे पंच्याहत्तर हजार लोकांचा मृत्यू होतो. या नवीन बंदीमुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाच्या प्रमाणात घट होईल आणि मुलांमध्ये धूम्रपानाची सवय लागण्याची शक्यता कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

ही बंदी फ्रान्सच्या २०२३–२०२७ राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश २०३२ पर्यंत “तंबाखूमुक्त पिढी” घडवण्याचा आहे. या निर्णयाचे देशभरात स्वागत होत असून, अनेकांनी याला सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले आहे.