यमुना एक्सप्रेसवेवर हिंदायान सायकल शर्यत होणार

उत्तर भारतातील वेगवान वाहतूक मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या यमुना एक्सप्रेसवेवर आता देशातील सर्वात वेगवान सायकल शर्यत ‘हिंदायान २०२५’ आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा दिनांक १५ जून २०२५ रोजी पार पडणार असून, देशभरातील प्रोफेशनल सायकलपटूंना सहभागी होता येणार आहे.

हिंदायान रेसिंग असोसिएशनच्या सहकार्याने व उत्तर प्रदेश सरकारच्या पाठबळाने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे उद्दिष्ट भारतात सायकलिंगला प्रोत्साहन देणे व पर्यावरणपूरक प्रवासावर भर देणे आहे.

या शर्यतीसाठी नोएडा ते आग्रा हा सुमारे दोनशे किमीचा रूट निवडण्यात आला आहे. सुमारे पाचशे हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू या शर्यतीत भाग घेतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.