इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये तीव्र तणाव

इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या नावाने इराणवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये तेहरानसह इतर प्रमुख शहरे हादरली असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट ईराणच्या अणुउर्जा केंद्रे, लष्करी तळ आणि महत्त्वाचे इंधन साठे उद्ध्वस्त करणे हे होते.

ईराण सरकारनुसार सुमारे दोनशे चोवीस नागरिक ठार झाले, तर एक हजार दोनशे सात्याहत्तर जण जखमी आहेत. इस्रायल सरकारच्या माहितीनुसार त्यांच्या बाजूला चौदा नागरिक मृत्युमुखी पडले आणि सुमारे चारशे जण जखमी झाले आहेत.
तेहरानमधील नागरिकांनी शहरे सोडून शेजारील ग्रामीण भागात आश्रय घेतला. पेट्रोल पंप, औषध दुकाने आणि अन्नसामग्री विक्री केंद्रांवर अफाट गर्दी झाली असून, वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. सरकारने काही भागांमध्ये माहिती तंत्रज्ञान सेवा बंद केल्या आहेत, त्यामुळे संपर्क व्यवस्था खंडित झाली आहे.

ईराणने उत्तर हल्ला करत इस्रायलच्या तेल अवीव, हायफा, अश्दोद आणि बाथ यांसारख्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या प्रतिहल्ल्यात सुमारे दहा ते चौदा इस्रायली नागरिक ठार, आणि शेकडो जण जखमी झाले असल्याचे
संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन महासंघ व अमेरिका यांनी दोन्ही देशांना तातडीने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. ही घडामोड संपूर्ण पश्चिम आशियातील शांती व स्थैर्य यासाठी गंभीर आव्हान निर्माण करणारी आहे. तेहरानमध्ये सुरू असलेली स्थिती पाहता आगामी काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.