पालक-बेसन पोळी

साहित्य : बेसन – 3 चमचे, तांदूळ पीठ – 2 चमचे, रवा – 1 मोठा चमचा, लाल मिरची पावडर – 1 लहान चमचा, दही – 2 चमचे, हळद पावडर – पाव लहान चमचा, चिरलेला पालक – १ कप, चवीनुसार मीठ, तेल – गरजेनुसार, पाणी.

कृती : प्रथम एक मोठे पातेले घ्यावे. त्यात पालक व पाणी वगळता सर्व साहित्य चांगले मिसळावे. आता गॅसवर पॅन ठेवावे. त्यात 1 मोठा चमचा तेल घालून गरम करावे. यानंतर गरम तेलात जिरे, हिंग आणि मोहरी घालून चांगली फोडणी द्यावी. आता त्यात पालक टाकून मध्यम आचेवर साधारण २ मिनिटे परतून घ्यावे. नंतर गॅस बंद करावा. हा पालक चांगला मॅश करुन घ्यावा. आता त्यात बेसन घालावे. पाव कप पाणी घालून सर्व साहित्य नीट मिसळून आणि जाडसर पीठ तयार करावे. त्यानंतर, पॅन मोठ्या आचेवर ठेवावे. त्यात 3 ते 4 चमचे तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यावर हे तयार मिश्रण घालून खरपूस भाजून घ्यावे. दोन्ही बाजूंनी परतून सोनेरी-तपकिरी रंगावर छान खरपूस भाजावे. पूर्ण शिजल्यावर थाळीत ठेवून खाण्यास द्यावे.






20,165 वेळा पाहिलं