मधुमेह असल्यास जीवनशैली बदला

बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. मधुमेह ही अशीच एक समस्या आहे, जी जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करते. भारतातही काही काळापासून मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. हा आजार औषधे आणि जीवनशैलीत काही बदल करून आटोक्यात ठेवता येतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा अन्नपदार्थाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर रुग्णांना देतात. याशिवाय मधुमेही रुग्ण त्यांच्या दिनक्रमात काही बदल करून स्वत:ला निरोगी ठेवू शकतात. सकाळच्या दिनचर्येमध्ये काही बदल करुन आपण मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो. यामुळे आपली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

मधुमेही रुग्णांनी आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवावी. नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशीही त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी दिवसभर स्थिर ठेवण्यास मदत होईल. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता सकस असणे आवश्यक आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. दिवसभर उर्जेने परिपूर्ण राहता येते.

निरोगी राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवसभर पुरेसे पाणी प्या. पुरेसे पाणी तुमची रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात देखील मदत करते. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल, तर व्यायामाला आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवा. दररोज सकाळी व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवता येते. तुम्हाला दिवसभर ताजेतवानेही वाटेल.







18,682