पाळोळे किनारा

पाळोळे समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक गजबजलेला किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा या किनाऱ्यावरुन चालणे आनंददायी आहे. हा किनारा विशेष्त: नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ‘सायलेंट डिस्को’ समाविष्ट आहे. येथे अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खजुरीची झाडे आणि रंगीबेरंगी लाकडी शॅकने नटलेला हा समुद्रकिनारा ‘कॅनाकोना’ बेटाच्या समोर आहे. हा तेथील निवासी माकडांसाठी ओळखला जातो.

दक्षिणेस गालगीबागा समुद्रकिनाऱ्यावर कासवांची घरटी आढळतात. येथून जवळच असलेले खोतीगाव वन्यजीव अभयारण्य आपण पाहू शकता. येथे पक्षी, रानडुक्कर आढळतात. कॅनाकोना बेटावरील मर्कटलीला येथून पाहता येतात. हा समुद्रकिनारा बोटींनी गजबजलेला, दक्षिण गोव्यातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.पाळोळे हा राज्यातील सर्वात नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. नारळाच्या घनदाट झाडांनी वेढलेला हा किनारा स्थानिक मच्छिमार आणि परदेशी पर्यटक दोघांचेही स्वागत करतो. येथील मच्छीमार किनाऱ्यालगत किंवा मुख्य गावातच राहतात. समुद्राची खोली हळूहळू वाढत जाते.

समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेकडील टोक सर्वात उथळ असल्याने ते पोहणाऱ्यांसाठी सुरक्षित असून प्रवाह वेगवान नसतात. जवळचे विमानतळ दाबोळी हे 67 किमी अंतरावर आहे. काणकोण हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. पाळोळे किनाऱ्यावर जाण्यासाठी मडगाव येथील कदंब परिवहन महामंडळाच्या बस डेपोवरुन दर अर्ध्या तासाने बस सेवा आहेत. या किनाऱ्यावर योग वर्ग, डॉल्फिन-स्पॉटिंग ट्रिप, आयुर्वेदिक मसाज केले जाते. येथे देशी तसेच विदेशी पर्यटकांचीही मोठी गर्दी असते.






15,174 वेळा पाहिलं