येडशी रामलिंग घाट

धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे पर्यटकांसाठी एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. या अभयारण्याची स्थापना सन् १९९७ साली करण्यात आली. अवघ्या २२.३८ चौ.किमी. क्षेत्रफळावर वसलेल्या या अभयारण्यात काही मोजकेच पक्षी-प्राणी विपूल प्रमाणात आढळतात. यामध्ये लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादींचा समावेश आहे.

एका प्राचीन मंदिरामुळे या अभयारण्याची शोभा अधिकच वाढलेली आहे. येथे श्रीराम मंदिर आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर एक धबधबा असून या धबधब्याखाली एक गुहा आहे. यामुळे या अभयारण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
असे सांगितले जाते की, जेव्हा रावण सीतेचे अपहरण करून लंकेस निघाला होता, तेव्हा त्याने तिथे मुक्काम केला. तिथे एक आंघोळीची न्हाणी आहे. त्या न्हाणीला ‘सीतेची न्हाणी’ असे म्हणतात. येथेच रावणाची आणि गरुडाची लढाई झाली होती. तेव्हा रावणाने त्या गरुडाचे पंख कापून त्याला ठार मारले होते. येथे त्या गरुडाची समाधी आहे. त्यामुळे हे स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.







21,915