वार्षिक फास्टॅग पास प्रक्रिया लवकरच सुरू होणार

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘फास्टॅग वार्षिक पास २०२५’ ही योजना जाहीर केली आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या या योजनेत, फक्त तीन हजार रुपये भरून खाजगी वाहनचालकांना एक वर्ष अथवा दोनशे टोल ट्रिप जे आधी पूर्ण होईल मोफत करता येणार आहेत.
ही योजना कार, जीप आणि व्हॅनसारख्या गैरव्यावसायिक वाहनांसाठी लागू असून, कोणताही स्वतंत्र कागदी पास नको. वापरकर्त्यांच्या अस्तित्वात असलेल्या फास्टॅग खात्यावरच ही योजना अॅक्टिव्ह होईल. यासाठी राजमार्ग यात्रा अॅप, एनएचएआय संकेतस्थळ, किंवा संबंधित अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
या योजनेचा लाभ घेतल्यास, वाहनचालकाला दरवर्षी होणाऱ्या सुमारे दहा हजार रुपयांपर्यंतच्या टोल खर्चावर तब्बल सत्तर टक्के बचत होऊ शकते. तीन हजार रुपयांच्या शुल्कात, राष्ट्रीय महामार्गावर दोनशे वेळा टोल न भरता प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. योजना सुरू झाल्यानंतर फास्टॅग वापरकर्त्यांना टोल प्लाझावर प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.