हेदवीचा सागरकिनारा

शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे.

येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या सावलीत बसून लाटांचे खेळ पाहता येतात. ‘रोहिले’चा छोटासा किनाराही येथून पाहता येतो. समुद्राच्या लाटांमुळे हेदवीजवळच्या खडकाळ किनाऱ्यावर एक घळ तयार झाली आहे. समुद्राच्या लाटा वेगाने या घळीत शिरतात. लाटा तिथे आपटल्या की 3 ते 4 मीटर उंचीचा फवारा या घळीतून उंच उडतो. फवाऱ्याची उंची ही लाटांच्या जोरावर अवलंबून असते. त्यामुळे उधाणाच्या वेळी पाण्याच्या उंच फवाऱ्याचे दृश्य मन लुब्ध करते. असा हा वैशिष्ट्यपूर्ण किनारा पहावाच!

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
551 वेळा पाहिलं