देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिनांक ४ जून २०२५ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार तीनशे दोन वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत जवळपास तीनशे नवीन रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रमुख राज्यांतील स्थिती:

केरळ : १,४४६ सक्रिय रुग्णांसह सर्वाधिक प्रभावित राज्य.
महाराष्ट्र : ४९४ सक्रिय रुग्ण.
गुजरात : ३९७ सक्रिय रुग्ण.
दिल्ली : ३९३ सक्रिय रुग्ण

गेल्या चोवीस तासांत केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याच्या वाढीमागे ओमिक्रॉनच्या नवीन उपप्रकारांचा हात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 हे उपप्रकार अधिक संसर्गजन्य असू शकतात, परंतु त्यांचे गंभीर परिणाम अद्याप स्पष्ट नाहीत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे. वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्या. लसीकरण पूर्ण करणे आणि बूस्टर डोस घेणे.

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोविड-१९ संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.