परभणीतील पारदेश्वर मंदिर

परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव स्वतःच्या मुखातून देवी पार्वती यांना पारदचे गुप्त ज्ञान देतात. ते म्हणतात, की ‘मम बीजं तू पारदः’ म्हणजे पारद ही माझी बीज शक्ती आहे. पारद हा धातु आहे. असे हे पारदेश्वर लिंग येथे आहे. श्री पारदेश्वर महादेवांच्या या मंदिराचा मुख्य दरवाजा दर्शनीय आहे.

पृथ्वीतलावरील केदार, पशुपतीनाथ अशी द्वादश ज्योर्तिलिंगे असून त्यांच्या दर्शनातून जे पुण्य प्राप्त होते, तेवढे पुण्य या पारद शिवलिंगाच्या दर्शनाने प्राप्त होते, अशी मान्यता आहे. श्री पारदेश्वर महादेवांचे नामस्मरण करण्याने जन्मजन्मांतराच्या पापापासुन लवकर मुक्ती मिळते. या मंदिरात जायचे झाल्यास जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेडपासून परभणी ७० कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्गाने तेलंगाणा आणि महाराष्ट्र यांना जोडणारे परभणी हे शहर आहे. येथे जाण्यासाठी एसटी परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या आहेत. या मंदिरात महाशिवरात्री तसेच सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,363 वेळा पाहिलं