पुणे मेट्रोचे खडकी स्थानक प्रवाशांसाठी खुले

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे मेट्रोच्या खडकी स्थानकाचे उद्घाटन आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. हे स्थानक पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावर असून, खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो यांच्यात सुलभ आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.
खडकी, बोपोडी, औंध, कँटोन्मेंट, विद्यापीठ परिसर तसेच शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. विद्यार्थी, रेल्वे कर्मचाऱ्यांसह कामगार वर्ग आणि व्यापारी वर्गासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या स्थानकासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पूर्ण सुरक्षा पाहणी केली असून परवानगी दिली आहे. काही महिने स्थानिक पातळीवर झालेल्या जमीन हस्तांतरणाच्या अडचणींमुळे हे स्थानक उशिरा खुलं झालं, मात्र आता हे प्रवाशांच्या सेवेत समाविष्ट झालं आहे.
मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी सांगितले की, खडकी स्थानक सुरू झाल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यानची वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होईल.