सायन उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बृहन्मुंबई महानगरपालिकेने सायन येथील उड्डाणपुलाच्या कामांना गती दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पोहोच मार्ग आणि स्थानीय रहिवाशांसाठी पर्यायी निवास व्यवस्था ही दोन महत्वाची टप्पे लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश आहे. सध्या पुलाच्या जुन्या भागाचे हटवण्याचे आणि नव्या संरचनेच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. या पुलामुळे सायन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच पूर्व-पश्चिम जोडणी सुलभ होईल.
रेल्वे विभागाच्या समन्वयातून फूटओव्हरब्रिजचे काम ऑगस्ट 2025 पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित उड्डाणपुलाचे बांधकामही अधिक वेगाने पार पडणार आहे. बीएमसीने यासाठी स्वतंत्र निधी आणि यंत्रणा कार्यरत ठेवली आहे.
या प्रकल्पादरम्यान काही स्थानिकांना स्थलांतरित व्हावे लागणार असून, प्रभावित नागरिकांसाठी पर्यायी घरांची सोय बीएमसीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर विरोध किंवा अडथळे येण्याची शक्यता कमी झाली आहे.