
कोलंबियाच्या मध्य भागात आज पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिख्टर स्केलवर ६.२ तीव्रतेचा हा भूकंप नोंदवण्यात आला असून राजधानी बोगोटा आणि भोवतालच्या भागांमध्ये त्याचा प्रभाव जाणवला. भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती हलल्या, नागरिक घराबाहेर धावले, तर काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. अद्याप कोणतीही जिवितहानीची माहिती समोर आलेली नाही, मात्र बचाव पथक सतर्क आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोलंबियाच्या मध्य भागातील मेता प्रांतातील होता आणि तो जमिनीखाली सुमारे दहा किलोमीटर खोल होता, अशी माहिती आहे.
भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की राजधानी बोगोटामध्ये इमारती हलल्याची स्पष्ट जाणीव लोकांना झाली. सोशल मीडियावर अनेकांनी आपले अनुभव शेअर केले असून, रात्रीच्या शांततेत अचानक घरं हलल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन सतर्क झाले असून, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अल आहे. कोलंबियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात केली असून, नुकसानाचे अचूक अंदाज घेण्यासाठी पाहणी सुरू आहे. बोगोटा शहरातील शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रम आज बंद ठेवण्यात येणार आहेत, असे अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे.