भारतीय सैन्य अकादमीमध्ये महिलांचे प्रशिक्षण सुरू

भारतीय सैन्य अकादमी, देहराडून येथे प्रथमच महिलांसाठी अधिकृत लष्करी प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारतीय लष्कराच्या 93 वर्षांच्या परंपरेत महिलांना सरळ भारतीय सैन्य अकादमीमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

या निर्णयामुळे महिलांना संरक्षण सेवेत प्रवेशाच्या दृष्टीने महत्त्वाचे दार उघडले गेले असून, लिंगसमतेच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकण्यात आले आहे. या पहिल्या बॅचमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मधून निवड झालेल्या महिला कॅडेट्सचा समावेश आहे.

या महिला कॅडेट्सनी तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता १४ जुलै २०२५ पासून भारतीय सैन्य अकादमीमध्ये मध्ये सैन्य प्रशिक्षणास औपचारिक सुरुवात करणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये त्यांना शारीरिक क्षमता, शिस्त, नेतृत्वगुण, रणनैतिक कौशल्य आणि लष्करी जीवनशैली यांचा सखोल अभ्यास दिला जाणार आहे.

भारतीय सैन्य अकादमी प्रशासनाने सांगितले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण परिसरात विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या असून, अत्याधुनिक देखरेख यंत्रणा, स्वतंत्र निवास आणि आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

प्रशिक्षणानंतर या महिला कॅडेट्सना स्थलसेनेत अधिकाऱ्यांपदी नियुक्ती मिळणार आहे. यामुळे केवळ सैन्यदलातील महिला सहभाग वाढणार नाही, तर लष्करात नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या महिलांचा मार्गही अधिक सुकर होणार आहे.