⏰ वेळ – लोड... 📅 वार – लोड... 📆 तारीख – लोड... 🗓️ भारतीय दिनांक – ११ आषाढ, शके १९४७, वर्षा ऋतू ☀️ सूर्योदय : 06:12 🌇 सूर्यास्त : 19:18 🌝 चंद्रोदय : 19:20 🌚 चंद्रास्त : 04:30 📿 तिथी : आषाढ शु. ५ ✨ नक्षत्र : मघा 🌀 योग : सिद्धी 🔄 करण : कौलव 🌡️ मुंबई : लोड... 💰 सोने : ₹लोड... / 10 ग्रॅम । चांदी : ₹लोड... / किलो 💵 डॉलर : ₹लोड...

मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी सुरू असलेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक नऊ च्या कामात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. एकूण दहा पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या मेट्रो प्रकल्पाचे पंच्याण्णव टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, लवकरच प्रवाशांसाठी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

या मार्गिकेमध्ये एकूण आठ स्थानके असून त्यापैकी दहिसर ते रायगड नगर या टप्प्यातील चार स्थानकांवर म्हणजे दहिसर पूर्व, ओव्हराईवाडा, मिरागाव, काशिगाव असे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील सेवा लवकरच सुरू होणार आहे. महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता या मार्गावर विविध तांत्रिक चाचण्या आणि यंत्रणांची पाहणी सुरू आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे.

या मेट्रो मार्गाचे डेपो काशिगाव येथे उभारण्यात येत आहे, आणि ते अंतिम टप्प्यात आहे. येथेच मेट्रो गाड्यांच्या देखभालीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध होणार आहेत. हे स्थानक दहिसर मेट्रो स्थानकाशी मेट्रो क्रमांक सात सोबत जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना भाईंदर ते अंधेरी मार्गावर एकसंध प्रवास करता येणार आहे.