समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ‘‘सह्याद्री मराठी पुरस्कार’’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ठसा उमठवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येताील.
📖 शैक्षणिक क्षेत्रातील गौरव
समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ‘‘सह्याद्री मराठी पुरस्कार’’ सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण, उद्योग, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची ठसा उमठवणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येताील.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री आणि पुरुष शिक्षकांसाठी.
प्रत्येकी – प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार पुरस्कार.
सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून शिक्षण क्षेत्रात दीपवत सेवा करणाऱ्या कर्तबगार, सक्षम स्त्री संस्थाचालकांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ – एकूण चार मानाचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री आणि पुरुष शिक्षकांसाठी.
प्रत्येकी – प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार पुरस्कार.
🧑🌾 शेती क्षेत्रासाठीचे पुरस्कार
परंपरागत शेतीत नाविन्य, सेंद्रिय पद्धती आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे प्रगतशील शेतकरी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता सातत्याने मेहनत घेणाऱ्या आणि गावातील शेती सांभाळणाऱ्या संघर्षशील शेतकऱ्यांच्या जिद्दीचा गौरव करण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन, IoT, स्मार्ट सिंचन पद्धती यांचा यशस्वी वापर करून शेतीत नवदृष्टी निर्माण करणाऱ्यांचा सन्मान.
शेतीत प्रयोगशीलता, जैविक दृष्टिकोन आणि नवनवीन उत्पादन तंत्र वापरून अधिक उत्पादन व शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
नवीन युगातील स्मार्ट शेतकरी, आधुनिक साधनांचा वापर करून उत्पादन, वितरण आणि व्यवस्थापनात क्रांती घडवणाऱ्या नवोपक्रमशील शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
👑 सह्याद्री मराठी स्वामिनी पुरस्कार
विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना देण्यात येणारा पुरस्कार
राजकारण, प्रशासन, समाजसेवा वा उद्योग क्षेत्रात प्रभावी नेतृत्व करून समाजपरिवर्तन घडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वगुणांचा सन्मान करणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार.
कला, साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य, लोककला वा नवसर्जनाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन करणाऱ्या प्रतिभावान, सृजनशील आणि प्रेरणादायी महिलांच्या कार्याला दिला जाणारा विशेष सन्मान.
💼 व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील सन्मान
मराठी भूमीतून उगम पावलेल्या उद्योगांनी जागतिक पातळीवर झेंडा रोवलेला असावा, हीच प्रेरणा. कार्याच्या आधारावर पुढील पुरस्कार दिले जातील.
रुग्णसेवेच्या प्रत्येक टप्प्यावर अथक मेहनत घेणाऱ्या परिचारीका, तंत्रज्ञ, सहाय्यक व रुग्णवाहिका चालक यांच्यासारख्या आधारस्तंभ कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेसाठी हा पुरस्कार.
प्रगत वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या, माफक दरात सेवा देणाऱ्या रुग्णालयांना सामाजिक बांधिलकीसाठी हा गौरव सन्मान स्वरूपात प्रदान केला जातो.
डॉक्टरी पेशाला नोकरी किंवा व्यवसाय नव्हे तर एक जीवनध्येय समजून, आयुष्यभर समर्पित भावनेने, निःस्वार्थपणे रुग्णहितासाठी कार्य करणाऱ्या आदर्श वैद्यकांसाठी हा विशेष सन्मान.
🏛️ सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुरस्कार
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सह राज्य शासनात कार्यरत असलेल्या उल्लेखनिय कार्य केलेल्या विविध स्तरातील कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणारे पुरस्कार.
प्रभावी सेवा, पारदर्शक कारभार, नागरिकाभिमुख योजना आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या उत्कृष्ट स्वायत्त संस्था, त्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिला जाणारा सन्मान.
नियमित, सुरक्षित, वेळेत, स्वच्छ आणि लोकसुलभ सेवा देणाऱ्या परिवहन यंत्रणेसाठी; चालक-वाहक, कर्मचारी व अधिकाऱ्यांना यांच्या समर्पणाचा गौरव करणारा विशेष पुरस्कार.
🏔️🩵 मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी मुलूखाचा प्रखर अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला — ‘सह्याद्री मराठी वाहिनी’ समर्पित आहे! 🩵🏔️
संकेतस्थळाला भेट
अनुसारक
परिवार सदस्य
दर्जा मानांकन
सह्याद्री मराठी वाहिनी
माध्यम । उपक्रम । परिवार
सह्याद्री मराठी वाहिनीत आपलं स्वागत आहे.
आम्ही आपली कशाप्रकारे मदत करु शकतो?