💡 संकल्पना : ‘मी’ पासून ‘आपण’कडे ची वाटचाल
सध्याच्या काळात कुटुंबव्यवस्थेला छेद गेलेला दिसतो. आई-वडील आणि एक अपत्य, अशा त्रिकोणी किंवा फारतर चौकोनी कुटुंबसंस्थेला प्राधान्य दिलं जात आहे.
एक काळ होता, जेव्हा एकत्र कुटुंबपद्धती रूढ होती. सुख-दुःख एकमेकांत वाटली जात. कुटुंबातील एखादी व्यक्ती कमकुवत असली, तरी तिचा आधार होणारे अनेकजण आसपास असायचे. ज्यांच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवून मन मोकळं करता यायचं.
जसजसा माणूस प्रगती करू लागला, तसतसं त्याला स्वतःच्या कमतरता दुसऱ्यांपुढे मांडण्यात कमीपणा वाटू लागला. एकाच घरात निर्माण झालेली दुरावा वाढत गेला आणि समाजातही त्याचा विस्तार झाला.
आजचा समाज तुकड्यांमध्ये विखुरलेला आहे. या समाजाला पुन्हा एकत्र आणण्याचा एक प्रयत्न म्हणजे — सह्याद्री परिवार.
शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या तीन पायाभूत गरजांसाठी आम्ही सातत्याने कार्य करत आहोत. एक विचार, एक ध्येय आणि एकतेचा मंत्र घेत आम्ही पुढे चाललो आहोत — सगळ्यांना घेऊन, सगळ्यांसाठी!
🏡 गाव तिथं सह्याद्री परिवार
जिथे गाव, तिथे सह्याद्री परिवाराचा एक स्वयंसेवक असेल. तो कोणत्याही आदेशाशिवाय, स्वयंप्रेरणेने काम करेल. स्थानिक समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल. माध्यमांचा वापर आम्ही ना सत्तेसाठी करणार, ना वैयक्तिक स्वार्थासाठी – आमचा उद्देश आहे समाजाची आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रगती साधणे. सह्याद्री परिवारात राजकारणाला थारा नाही. सर्वांच्या विकासासाठी सर्वांनीच हातभार लावावा, ही आमची भावना आहे. गरजूंसाठी उपक्रम राबवले जातील, मदतीचा हात दिला जाईल. एखादं घर जसं आपल्याला आधार देतं, तसंच कार्य सह्याद्री परिवार करत राहील – विश्वासाचं आणि संवेदनशीलतेचं घर.
🤝 सहभागी व्हा
📜 सह्याद्री परिवार – नियम व आचारसंहिता
“सह्याद्री परिवार” ही केवळ संस्था नसून, एक विचार, एक चळवळ आणि एक सामाजिक बांधिलकी आहे. समाजाच्या आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या परिवाराच्या संकल्पनेला दिशा, शिस्त आणि टिकाव देण्यासाठी खालील नियमावली तयार करण्यात आले आहेत.
अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण.
सामाजिक कार्याची ओळख, आवड किंवा योगदान.
समाजातील गरजू व दूर्बल घटकांना मदत करण्याची दूर्दम्य इच्छा.
परिवाराच्या कामाला वेळ देण्याची तयारी.
सभोवतालची सामाजीक, राजकीय, प्रशासकीय, अर्थिक स्थितीची माहिती.
उदरनिर्वाहाचे ठोस साधन.
नावावर कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नसावा.
राजकीय पक्षाचा प्राथमिक किंवा सक्रिय सदस्य नसावा.
वैयक्तिक माहिती अचूक भरलेला सदस्यत्वासाठीचा अर्ज.
परिवाराचे मुख्य संघटक तथा अध्यक्ष : सह्याद्री मराठी वाहिनीचे मुख्य संपादक
वैयक्तिक स्वार्थासाठी सह्याद्री परिवाराचा उपयोग करता येणार नाही.
पारदर्शकता, नम्रता व सामाजिक संवेदनशीलता यांचा अंगीकार करावा.
इतर व्यक्ती, समाज अथवा संस्थांशी भांडण किंवा द्वेषभावना बाळगू नये.
सामाजिक प्रश्नांवर मत मांडताना संयम, तटस्थता आणि विचारपूर्वक भूमिका घ्यावी.
समाजाला मदत करताना शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.
शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी यांना वेठीस धरु नये.
समाजमाध्यमांवर “सह्याद्री परिवार”च्या नावाने कोणतीही माहिती / मत प्रसिध्द करु नये.
वक्तव्ये, मते आणि कार्याचा अहवाल केवळ मुख्य कार्यालयाकडून प्रसिध्द केला जाईल.
अफवा, धार्मिक तेढ, राजकीय प्रचार यापासून दूर रहावे.
ठरावीक कालावधीत, महिन्याला किमान १ बैठक आयोजित करावी.
अहवाल लेखन, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार नोंदी ठेवाव्यात.
स्थानिक पातळीवरील उपक्रमांना पूर्वसंमती आवश्यक.
कोणत्याही गंभीर गैरवर्तनासाठी प्रथम समज, नंतर लेखी कारणे विचारून निलंबन.
आर्थिक अपहार, जातीवाद, राजकीय प्रचार किंवा सह्याद्रीच्या नावाचा गैरवापर यावर तात्काळ कारवाई.
हे नियम सह्याद्री परिवाराच्या एकात्मतेसाठी तयार करण्यात आले असून, वेळोवेळी यामध्ये सुधारणा करता येतील. हे नियम अंगीकारूनच सहभागी सदस्यांनी कार्य करावे..