दहा ते वीस टक्के आयात शुल्क योग्य – रघुनाथ राजन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारताने अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चांमध्ये दहा ते वीस टक्क्यांच्या दरम्यानचा आयात शुल्क स्तर ठेवणे अधिक योग्य राहील, असे म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अत्यंत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी भारताला एक वास्तववादी आणि स्पर्धात्मक भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. राजन यांच्या मते, जागतिक पुरवठा साखळीत भारताला स्वतःला स्पर्धात्मक ठेवणे आवश्यक आहे. आशियाई देशांनी सरासरी एकोणवीस टक्क्यांच्या आसपासच्या दरांवर अमेरिकेशी करार केले आहेत. जपान आणि युरोपचा आयात कर पंधरा टक्के आहे, तर सिंगापूरने दहा टक्क्यांच्या दरावर सहमती दर्शवली आहे. या जागतिक बेंचमार्कनुसार, भारतासाठी दहा ते वीस टक्क्यांदरम्यानचा आयात कर ठेवू शकतो.

राजन यांनी भारताला व्यापार करारांमध्ये अवास्तव किंवा धोकादायक आश्वासने न देण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. जे निर्णय किंवा लक्ष्य पूर्ण करणे देशासाठी अवघड ठरू शकते, असे आश्वासन देऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे. केवळ अल्पकालीन फायदा मिळवण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ तोटा लादणे शहाणपणाचे नाही. जपान आणि युरोपचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ज्यांनी अमेरिकेला मोठी गुंतवणूकविषयक आश्वासने दिली आहेत. ही आश्वासने त्यांच्या अर्थव्यवस्थेला तोटा न होता पूर्ण करता येतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. भारताने अशी अडचण टाळावी.

यासोबतच राजन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्काच्या धोरणांना भारतासाठी एक जागे होण्याचा इशारा म्हटले होते. त्यांनी भारताला कोणत्याही एकाच देशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून न राहता, पूर्वेकडील देश, युरोप आणि आफ्रिकेकडे लक्ष देऊन व्यापारी संबंधांचे विकेंद्रीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.






19,687 वेळा पाहिलं