निसार सात नोव्हेंबरपासून कार्यरत – आपत्ती व्यवस्थापनात मिळणार मदत

इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेतील निसार उपग्रह सात नोव्हेंबरला कार्यान्वित होईल. निसारमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हा उपग्रह नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती प्रदान करेल. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळेल. ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

हा उपग्रह शास्त्रज्ञांना भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमवर्षाव, जंगलातील बदल आणि शेती समजून घेण्यास मदत करेल. हा उपग्रह दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीची छायाचित्रे घेईल. हिमनद्यांचे विश्लेषण करेल. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जंगले आणि पाणथळ जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते वातावरणातील हरितगृह वायूंचे नियमन करतात. या जंगलांचे आणि पाणखळ जागांचे फोटो हा उपग्रह आपल्याला देईल. यासोबतच, चक्रीवादळे, वादळे, ज्वालामुखी, भूकंप, हिमनद्या वितळणे, समुद्री वादळे, जंगलातील आगी, समुद्राची वाढती पातळी, शेती, ओली जमीन, बर्फाचे प्रमाण कमी होणे इत्यादींबद्दल आगाऊ माहिती देईल. हा उपग्रह पृथ्वीभोवती साचणा-या कच-याची आणि अवकाशातील धोक्यांची माहिती देखील देणार आहे. निसार प्रकाशातील घट आणि वाढ याबद्दल देखील माहिती देईल.

हा उपग्रह आपल्याला आगाऊ नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. त्यामुळे तो वरदान ठरणार यात शंका नाही. हे अभियान पाच वर्षे चालेल आणि त्याचा डेटा मोफत तसेच सर्वांसाठी खुला असेल.






13,189 वेळा पाहिलं