अवकाळी पावसामुळे ठाण्यातील भातशेतीचे मोठे नुकसान – शेतकरी हवालदिल

महाराष्ट्राच्या कोकणातील भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर यंदा अवकाळीच्या पावसामुळे मोठे संकट ओढवले आहे. ऐन कापणीच्या तोंडावर असताना कोसळलेल्या या अवकाळी आणि जोरदार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. यामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यंदा पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील सुमारे छप्पन हजार हेक्टर जमिनीवर खरिपात भाताचे पीक घेतले जाते. त्यातुलनेत, यावर्षी पावसाने योग्य साथ दिल्याने पिके उत्तम दर्जाची आली होती आणि शेतकरी विक्रमी उत्पादनाच्या आशेवर होते. मात्र, परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामुळे ही आशा पूर्णपणे मातीमोल झाली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यातील एकतीस हजार हेक्टर भातशेतीचे या अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. या नुकसानीत कल्याण तालुक्याचा मोठा वाटा आहे. कल्याण तालुक्यातील अडुसष्ट गावे आणि पाड्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड झाली होती. त्यापैकी अंदाजे तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर इतक्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा अर्थ कल्याण तालुक्यात साठ टक्क्यांहून अधिक पीक धोक्यात आले आहे. हळवी, निम गरवी आणि गरवी अशा भात पिकांच्या जाती काढणीच्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसाने या पिकांची पुरती नासाडी केली. जर पावसाने आणखी विश्रांती घेतली नाही, तर उर्वरित पीकही नष्ट होईल, अशी भीती शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी भात कापून शेतात किंवा जमा केले होते, ते भिजून गेले आहे. पाण्यामुळे या दाण्यांना जागेवरच कोंब फुटू लागले आहेत. यामुळे भाताचा पूर्ण सडका होऊन तो कणसातून वेगळा करणेही शक्य होणार नाही. दुसरीकडे, जे पीक अजूनही उभे आहे, ते जोरदार पावसामुळे पूर्णपणे शेतात आडवे झाले आहे. पीक आडवे झाल्याने ते कुजून जाईल आणि त्याला बुरशी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती ना चांगला तांदूळ लागणार, ना गुरांसाठी तनस शिल्लक राहणार, अशी दुहेरी आपत्ती ओढवली आहे.

केवळ पीक हातातून गेले असे नाही, तर या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. पाण्यात भिजलेल्या भाताचे दाणे काढल्यानंतर ते पूर्णपणे न निघता त्याचे तुकडे पडतात. असे तुकडे झालेले तांदूळ बाजारात विक्रीसाठीही योग्य नसतात, आणि त्यांची किंमतही खूप कमी मिळते. परिणामी, शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही.

भाताच्या पिकापासून मिळणारा पेंढा जनावरांसाठी महत्त्वाचा चारा असतो. पीक भिजल्यामुळे पेंढा पूर्णपणे खराब झाला असून, त्याचा तुटवडा भासणार आहे. भातपिकाशी संबंधित तूस आणि पेंढा यांच्या टंचाईमुळे त्यांच्या दरात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे जनावरे पाळणे अधिक महाग होणार आहे.

या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदील झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या  या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याच मागणी प्रशासनाकडे त्वरित केली जात आहे. ठामे तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे कृषी अधिकारी आणि महसूल विभागाने युद्धपातळीवर सुरू करावेत. सरसकट भरपाई: नुसते पंचनामे न करता, नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून ती त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. नैसर्गिक आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने कल्याण तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या केल्या जात आहेत.






22,578 वेळा पाहिलं