अमेरिकेतील हिमवादळाचा विमानसेवेला मोठा फटका – हजारो उड्डाणे रद्द

अमेरिकेच्या उत्तर-पूर्व आणि दक्षिण भागाला एका महाकाय बर्फाळ वादळाने कचाट्यात घेतले असून, यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आर्कांसासपासून न्यू इंग्लंडपर्यंत सुमारे दोन हजार शंभर किलोमीटरच्या पट्ट्यात फूटभर जाडीचा बर्फ साचला असून, थंडीचा कडाका उणे एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. सोमवारी देशभरात सुमारे आठ हजारांहून अधिक विमान उड्डाणे रद्द किंवा लांबणीवर टाकण्यात आली. विशेषतः रविवारी पंचेचाळीस उड्डाणे रद्द झाली होती.

रस्ते बर्फाखाली गाडले गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून अनेक महामार्ग बंद करण्यात आले आहेत. न्यू यॉर्क शहरात सेंट्रल पार्कमध्ये अकरा इंचांहून अधिक बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. वादळामुळे झाडे उन्मळून वीजवाहिन्यांवर पडल्याने लाखो नागरिक अंधारात आहेत. देशभरात सुमारे सात लाख पन्नास हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका दक्षिण अमेरिकेतील मिसिसिपी आणि टेनेसी राज्यांना बसला आहे. वीज नसल्यामुळे घरांत हीटिंग यंत्रणा बंद पडली आहे. हजारो नागरिक गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत असून, अनेकांनी हॉटेलमध्ये आश्रय घेतला आहे. मिसिसिपीमध्ये १९९४ नंतरचे हे सर्वात भीषण बर्फाळ संकट असल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षण आणि जनजीवन मिसिसिपी विद्यापीठासह अनेक शाळा आणि महाविद्यालये आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक शहरांत वॉर्निंग स्टेशन्स सुरू करून नागरिकांना ब्लँकेट्स, जनरेटर्स आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. राष्ट्रीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील चोवीस तासांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये सरासरी तापमान उणे बारा पूर्णांक तीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे, हे २०१४ नंतरचे सर्वात कमी तापमान असेल. फ्लोरिडा वगळता संपूर्ण देश सध्या गोठलेल्या अवस्थेत आहे.






9,016 वेळा पाहिलं