
नाशिक जिल्ह्यातील ‘मोरागड’ आहे, जणू काही हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच आहे. किल्याल्चा गडमाथा म्हणजे एक पठारच आहे. पठारावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर चढताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. दोन-तीन वाड्यांचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. येथे माथ्यावर एक सुंदर बांधीव तलाव आहे. याव्यतिरिक्त गडावर आणखी काही नाही. या गडावरून मुल्हेरचे पठार-माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी पाहता येते.
मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. येथून भडंगनाथांच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. या वाटेने थोडे वर गेल्यावर मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून गडावर जाण्यासाठी अर्धा तास पुरतो. गडावर जाताना तीन दरवाजे लागतात. मोरागडावर राहण्याची सोय नाही. गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र त्यांना उन्ह्याळ्यात पाणी नसते.