अंजुना समुद्रकिनारा

गोवा म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि निसर्गरम्य बीच ! गोवा राज्य मुंबईच्या दक्षिणेस सुमारे ४०० किमी अंतरावर आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे ! गोवा राज्य पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे. राज्याला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून गोवा प्रत्येक पर्यटकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील सूर्य, वाळू व समुद्रकिनारे हे प्रमुख आकर्षण आहेत. ज्यांना विश्रांतीची गरज आहे, त्यांच्यासाठी गोवा एक परिपूर्ण जागा आहे. या लेखाद्वारे ‘अंजुना समुद्रकिनाऱ्या’ची माहिती पाहूया.

अरबी समुद्राने वेढलेले अंजुना समुद्रकिनारा तेथील नैसर्गिक खडकांच्या निर्मितीसाठी एक चित्तथरारक ठिकाण आहे. त्याची रहस्यमय दगडी रचना आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्य देते. ताडाची झाडे, एका बाजूला दगडी भिंत आणि विस्तीर्ण वाळूसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी होणाऱ्या फूल मून पार्टी, अत्याधुनिक संगीतरजनी हे देशभरातील युवकांचे आकर्षण आहे.

बुधवारी फ्ली मार्केटमध्ये जाऊ शकता, येथे तुम्ही गोव्यातील विविध प्रकारचे कपडे, दागिने, स्मृतिचिन्हे, समुद्री शिंपल्यापासून बनवलेल्या वस्तू इत्यादी खरेदी करू शकतात. समुद्रकिनारी फोटोग्राफी करू शकतात.
अंजुना समुद्रकिनाऱ्यावर कसे पोहोचावे ?
• पणजी बस स्थानकापासून अंतर – 20 किमी.
• थिवीम रेलवे स्टेशनपासून अंतर – 19 किमी.
• मडगांव रेलवे स्टेशनपासून अंतर – 55 किमी.
• दाबोळी विमानतळापासून अंतर – 47 किमी.







11,641