रत्नागिरीतील मांडवी

महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला असलेला ‘मांडवी’ हा रत्नागिरीतील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. ही किनारा विस्तीर्ण आणि सुंदर असून ‘राजिवंडा’ बंदरापर्यंत आहे. या किनाऱ्यावरील वाळू काळी आहे. त्यामुळे याला ‘काळा समुद्र’ देखील म्हणतात. येथे गेल्यावर रत्नदुर्ग किल्ला पाहू शकता.

येथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या माथ्यावर एक बुरुज असून त्याला ‘रत्नागिरीचे प्रवेशद्वार’ असेही म्हटले जाते. समुद्रकिनाऱ्यावरील पॅरासेलिंग, कॅमल राइड, हॉर्स रायडिंग, बंपर बोट राइड, जेट स्कीइंग, वॉटर स्कूटर राइड, सर्फिंग या जलक्रीडा पर्यटकांना किनाऱ्यावर आणण्यासाठी आकर्षित करतात.

वर्षभर या किनाऱ्यावर कधीही जाऊ शकता. रत्नागिरी बसस्थानकापासूनचे या किनाऱ्याचे अंतर सुमारे 1 किमी आहे. हा रत्नागिरी विभागातील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त समुद्रकिनाऱ्यांपैकी एक किनारा असून तो जलक्रीडाप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. मांडवी किनाराजरी काळ्या वाळूमुळे काहीसा आकर्षक दिसत नसला तरीही येथे गर्दी फार असते. मांडवीमध्ये ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ सह रत्नागिरी जेट्टी देखील आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी येथे मोठी गर्दी असते. या किनाऱ्यावरील वाळूवरून चालणे आणि अंगावर वारे झेलणे हा एक सुखद अनुभव आहे.






211 वेळा पाहिलं