दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

महाराष्ट्रात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले होते. स्थापनेपासून हे मंदिर गणपती उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती उत्सव सुरु केला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त सचोटीने आणि समर्पणाने विविध उपक्रम येथे राबवीत असतात.

या मंदिराच्या इतिहासाप्रमाणे मंदिराची वास्तूही तितकीच भव्य आहे. ‘जय’ आणि ‘विजय’ चे संगमरवरी पुतळे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या गाभार्‍यात 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद गणपतीची मूर्ती असून ती 8 किलो सोन्याने सजलेली आहे.

स्थानिक लोक म्हणतात, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराप्रमाणे गणेश चतुर्थी साजरी करणारी मंदिरे पुण्यात कमी आहेत. हे मंदिर प्रामुख्याने गणपती उत्सवासाठीच ओळखले जाते. येथे हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. पूर्वी गणेश चतुर्थी उत्सवाचा उपयोग लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ म्हणून केला होता.

मंदिराचे संस्थापक दगडूशेठ हलवाई हे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. सन 1800 च्या उत्तरार्धात, दगडूशेठ हलवाई यांनी आपला मुलगा प्लेगच्या साथीने गमावला. त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर दगडूशेठ हलवाई यांची पत्नी पूर्णपणे नैराश्यात गेली. त्यावेळी श्री माधवनाथ महाराजांनी गणेश मंदिर बांधण्याची शिफारस केली. ते सन 1983 मध्ये पूर्ण झाले. गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना लोकमान्य टिळकांची होती. मंदिराची संगमरवरी रचना देखील लक्ष वेधून घेण्यासारखी आहे. वेळोवेळी भाविक सोने आणि इतर मौल्यवान धातू अर्पण करताना दिसतात. सध्या या मंदिराची देखभाल श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट करीत आहेत.






240 वेळा पाहिलं