अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स

निर्मात्यांनी ‘अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाच
पसंतीस उतरलेला दिसत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही अमेरिकेची टेलिव्हिजन मालिका आहे. या शोचे
परदेशाबरोबरच भारतातही चांगले चाहते आहेत. ही लोकप्रियता लक्षात घेत निर्मात्यांनी त्याचा प्रीक्वल ‘हाऊस
ऑफ द ड्रॅगन’ सुरू केला. त्याला जागतिक व्यासपीठावर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या शोइतकेच प्रेम मिळाले.


‘अ नाइट ऑफ द सेव्हन किंगडम्स’ या मालिकेची कथा जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या ‘टेल्स ऑफ डंक अँड एग’ या
कादंबरीतून घेण्यात आली आहे. कथा जसजशी पुढे जाईल तसतशी शोमध्ये दाखवलेली सर्व पात्रे वेगवेगळ्या
छटांमध्ये प्रकट होतील. ‘मीट डंक अँड एग’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यानंतर या ॲक्शनने भरलेल्या
मालिकेची झलक टीझरमध्ये दाखविण्यात आली.
या मालिकेत मॅट स्मिथ, ऑलिव्हिया कुक आणि इव्ह बेस्ट प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय मॅथ्यू नीडहॅम,
सोनोया मिझुनू, स्टीव्ह टॉसेंट हे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. ‘नाइट ऑफ द सेव्हन किंगडम’ सन 2025
मध्ये एचबीओ प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे..






21,577 वेळा पाहिलं