🤝 एकत्र येऊन बदल घडवू!
🌟 आम्ही कोण आहोत?
मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी राष्ट्र हितासाठी झटणे, हाच आमचा प्राण आणि प्रेरणा आहे. स्वतः देव, देश आणि धर्माचे कट्टर अनुयायी असलो तरी आम्ही इतर सर्व धर्मांचा, जातींचा आदर राखतो.
आमचा उद्देश केवळ बातम्या देण्यापुरता मर्यादित नाही. नकारात्मकतेचा प्रचार करण्याऐवजी, उमेद वाढवणारे, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारे सकारात्मक विचार, माहिती आणि बातम्या देण्यावर भर देतो.
एकाच विषयावर अनेक प्रतिक्रिया, वादग्रस्त चर्चासत्रे किंवा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे, हे आमच्या तत्वांमध्ये बसत नाही.
पत्रकारितेची भूमिका, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि मर्यादा आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहेत.
एक जागरूक आणि जबाबदार माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. माध्यमांवरचा समाजाचा विश्वास टिकवणं, हेच आमचं सर्वोच्च ध्येय आहे.
🎯 आमचा हेतू काय आहे?
समाजकारण ते राजकारण, व्यवसाय ते उद्योग आणि प्रशासन ते शासन — सर्व क्षेत्रांमध्ये मराठी जनतेच्या हितासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.
शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत गरजांबाबत समाजप्रबोधन आणि मार्गदर्शन करून, माध्यमाचा उपयोग लोकहितासाठी कसा होऊ शकतो, हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्ही फक्त बातम्या देणार नाही, तर समस्यांवर उपाय सुचवू.
संवेदनशील घटना जसे की अपघात, आत्महत्या, बलात्कार, गुन्हेगारीच्या बातम्या आणि राजकीय शिवीगाळ यांची केवळ सनसनाटी न करता, त्या घटनांमागच्या वास्तवाला समजून घेऊन पुनर्वसनासाठी प्रयत्न करू.
सतत सरकारवर दोषारोप न करता, समाजासाठी माध्यम म्हणून आमची जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
“राज्याच्या विकासाची गाथा आणि महती जगासमोर मांडून, महाराष्ट्राची मान अधिक उंचावण्यासाठी आम्ही हातभार लावू.”
🚀 हे आमचं काम असणार आहे !
आम्ही विविध क्षेत्रांतील दर्जेदार माहिती, विशेष बातम्या, अभ्यासपूर्ण अहवाल आणि तज्ज्ञांच्या मुलाखती दृक-श्राव्य माध्यमांद्वारे सादर करणार आहोत.
जगभरातील संधी, योजना, विकासप्रक्रिया या थेट मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू.
वाचक, प्रेक्षक, श्रोते — त्यांना जे उपयोगाचं, माहितीपूर्ण आणि हिताचं वाटेल, तेच आम्ही देऊ.
समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना समजून घेऊन, त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
सुरुवातीला डिजिटल आणि समाज माध्यमावर प्रभावीपणे उपस्थित राहून, पुढील टप्प्यात अधिक व्यापक पातळीवर विस्तार करण्याचा आमचा मानस आहे.