अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील सतरा हजार शेतकरी बाधित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत तब्बल चार हजार तीनशे अडतीस हेक्टर शेतीचं क्षेत्र पावसामुळे बाधित झालं आहे. या नुकसानामुळे पाचशे पंचवीस गावांतील सतरा हजार एकशे बाहत्तर शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुख्यतः भात, नाचणी…
पिंपरी-चिंचवडमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी – नागरिक त्रस्त
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागातील रस्त्यांची रचना नागरी रस्ता या संकल्पनेखाली केली जात आहे. मोरवाडी चौक येथे जुन्या पुणे‑मुंबई महामार्गच्या बाजूला रस्ता सुधारणा म्हणून सिमेंटचे ब्लॉक्स टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पदपथ मोठे झाले आहेत. मात्र, एकाच वेळी…
पुणे महापालिकेच्या खड्डेमुक्त पुणे उपक्रमाला सुरुवात
पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे शोधून दुरुस्त करण्यासाठी खड्डेमुक्त पुणे अभियान नावाने अॅप लॉन्च केला आहे. याद्वारे नागरिक, अभियंते आणि पथ विभाग या जोडण्याचे प्रयत्न होत आहेत, ज्या अंतर्गत खड्ड्यांविरुद्ध त्वरित कारवाई होईल असा हेतू आहे. नागरिकांना खड्डा आढळल्यास त्याचा फोटो घेऊन अॅपमध्ये तक्रार नोंदवता…
दिव्यांगांच्या संरक्षणासाठी राज्य आयुक्तांच्या कार्यपद्धतीस मंजुरी
दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, हक्क, सुरक्षा आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत कलम एकोणऐंशी ते त्र्याऐंशीनुसार आयुक्त, दिव्यांग कल्याण यांना ‘राज्य आयुक्त’ म्हणून अधिसूचित करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या…
जळगाव विमानतळाचा विस्तार होणार – पर्यटनाला चालना
जळगाव विमानतळावरून सध्या गोवा, हैदराबाद, पुणे, मुंबई शहरांसाठी विमानसेवा सुरु आहेत. तसेच येथे हवाई प्रशिक्षण केंद्र चालू आहे. मात्र, प्रवाशांना काही गैरसोयींचा सामना करावा लागतो कारण इतर आवश्यक भौतिक सुविधा या विमानतळावर नाहीत. या विकासासाठी अखेर परवानगी मिळाली असून तीस कोटींच्या निधी मंजुर करण्यात आला…
दहा ते वीस टक्के आयात शुल्क योग्य – रघुनाथ राजन
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारताने अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चांमध्ये दहा ते वीस टक्क्यांच्या दरम्यानचा आयात शुल्क स्तर ठेवणे अधिक योग्य राहील, असे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार अत्यंत महत्त्वाचे मत…
पाकिस्तान-चीन गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत आहेत – ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, पाकिस्तान आणि चीन गुप्तपणे अणु चाचण्या करत आहेत. ट्रम्प यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या या दाव्याचे चीनने खंडन केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, रशिया, चीन, उत्तर कोरिया…
अमेरिका-चीनमध्ये पुन्हा लष्करी संवाद सुरू
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांच्याशी ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ मध्ये मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये आयोजित आशियाई लष्करी बैठकीत या परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. या चर्चेत दोन्हीपक्षांनी लष्कर ते लष्कर संवाद वाहिनी सुरु करण्यावर सहमती दाखवली आहे. यामुळे उद्भवू…
इस्रोचे ऐतिहासिक यश – एलव्हीएम तीन – एम पाच रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रोने आपल्या शक्तिशाली एलव्हीएम तीन- एम पाच या रॉकेटद्वारे सीएमएस – शून्य तीन या भारताच्या सर्वात जड कम्युनिकेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून करण्यात…
ठाणे – बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सूटणार – प्रवाशांना दिलासा
ठाणे–बेलापूर महामार्ग हा नवी मुंबईतील औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावर वाहतूक प्रचंड वाढल्याने दररोज कोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघातांची मालिका सुरू होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास…
पूर्व ते पश्चिम मुंबईचा प्रवास होणार फक्त वीस मिनिटांत
मुंबईकरांचा मालाड ते ऐरोलीमधला वाहतूकीचा वेग आणखी वाढणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात पाच पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबईचा पश्चिम उपनगर…
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आता निदान चाचण्या सशुल्क
मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबतच महापालिकेतील कर्मचार्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत निदान सेवांवर आता शुल्क आकारले जाणार आहे. महापालिकेने नुकत्याच तयार केलेल्या नव्या धोरणानुसार, रुग्णालयांमधील सीटी स्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी यांसारख्या उच्च दर्जाच्या निदान चाचण्या खासगी संस्थांना आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत बीएमसी कर्मचार्यांना…
कणकवली-सिंधुदुर्ग स्थानकांवर आठ गाड्यांचा थांबा-पर्यटनाला चालना
कोकण रेल्वेने कणकवली आणि सिंधुदुर्ग या पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या स्थानकांवर आठ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. सोबतच पर्यटकांना देखील या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. हा निर्णय स्थानिक प्रवाशांच्या आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जात आहे. या निर्णयानुसार…
राज्यात रब्बी हंगामाची उशिराने सुरुवात – शेतकरी चिंतेत
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात रब्बी हंगामाची सुरुवात लांबली आहे. यामुळे पेरणीला उशीर होत आहे. काही भागात जमिनीतील ओलावा जास्त असल्याने आणि वाफसा परिस्थिती नसल्याने पेरणी करणे कठीण झाले आहे. तर काही ठिकाणी अद्याप खरीप पिकांच्या कापणीचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत…
नाशिक व अमरावती जिल्ह्यांना नवसंशोधन प्रशिक्षण केंद्रांची मंजुरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून नाशिक आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यांना ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर झाले आहे. महाराष्ट्राला उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ‘सी-ट्रिपल…
देशभरात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा – नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने देशभरात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांत सक्रिय असलेले ‘मोथा’ चक्रीवादळ आता हळूहळू कमजोर होत असले तरी त्याच्या परिणामस्वरूप पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस, तर काही…
पाकिस्तानच्या कलात जिल्ह्यात हल्ला – बलूचिस्तानात बीएलएची मोठी कारवाई
पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांत पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कलात जिल्ह्यातील मंगोचर परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर ‘बलूच लिबरेशन आर्मी’ या बंडखोर संघटनेने हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक सैनिक जखमी झाले असून त्यात दोन कमांडो अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला स्पेशल स्नायपर्स आणि…
आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय – नागरिकांना मोठा दिलासा
मद्रास उच्च न्यायालयाने आधार कार्डाबाबत दिलेल्या निर्णयामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, आधार कार्ड अद्ययावत करणे हा नागरिकांचा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत नागरिकांना कोणतीही अडचण किंवा त्रास होऊ नये, याची जबाबदारी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने…
रशिया-भारत भागीदारी झाल्याने अमेरिकेची चिंता वाढली
रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही भारताने रशियाकडून तेल आणि सूर्यफूल तेल खरेदी वाढवून जागतिक बाजारात आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका सध्या रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लावत असून, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा…
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एकूण दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता…
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात सिंधुदुर्ग अग्रणी – नीती आयोगाचे पथक जिल्हा दौर्यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा यशस्वी आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. देवव्रत त्यागी आणि विदीशा दास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान पोलीस विभाग आणि रस्ते परिवहन विभागाकडून एआय प्रणालीचा वापर कशा प्रकारे केला जात आहे, याविषयी सविस्तर माहिती घेण्यात…
औद्योगिक प्रगतीसाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला वाढीव अधिकार मिळणार
राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण एकशे चौपन्न सुधारणा समाविष्ट असून, त्यांची अंमलबजावणी दिनांक 14 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी…
सागरी मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी जनगणना मोहिमेला सुरुवात
सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागातर्फे तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ या उपक्रमाला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही देशातील पाचवी सागरी मत्स्य…
शेतकऱ्यांच्या हितासाठी पणन महासंघ नवे उपक्रम राबविणार
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्व संलग्न संस्थांनी एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची वार्षिक सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात संपन्न झाली. या…
जागतिक सुरक्षेसाठी भारत-अमेरिका एकत्र
भारत आणि अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी दहा वर्षांच्या दीर्घकालीन संरक्षण करारावर स्वाक्षरी केली असून हा करार आगामी दशकभर दोन्ही देशांच्या सुरक्षा, संरक्षण तंत्रज्ञान आणि रणनीतिक सहकार्याला नवी दिशा देणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव…