इस्राईल-हमास संघर्ष अधिक तीव्र
गाझा पट्टीवर इस्राईलकडून करण्यात आलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांमध्ये किमान एकशे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्राईलच्या रात्रीच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीत भीषण…
विज्ञान क्षेत्रात भारताची उंच भरारी – आयआयटी मद्रासचा प्रयोग ठरला यशस्वी
आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी ‘उभ्या दिशेने उड्डाण आणि अवतरण’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विमान आणि मानवरहित हवाई ड्रोनची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. या चाचणीत संकरित रॉकेट प्रेरकाचा वापर करण्यात आला असून, मोठ्या धावपट्टीशिवाय विमानाचे उड्डाण आणि अवतरण शक्य होणार आहे. हा प्रयोग भारतीय विमानचालन…
डीबीटी प्रणालीमार्फत ऊसतोड कामगारांना आरोग्य व कल्याणाच्या सुविधा मिळणार
राज्यात ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांना डीबीटी प्रणालीद्वारे मदत देण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने सादर करावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विधानभवनात…
शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक
शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कामगारांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी…
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा – कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्जमाफीच्या दृष्टीने…
सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप – दोनशे साठ कोटींचे सामंजस्य करार
मुंबईतील नेस्को, गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक या भव्य प्रदर्शनादरम्यान महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत एकूण दोनशे साठ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांवर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज…
सांगली-सोलापूरमधील शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा बदलणार
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता सरकारने आता आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील मार्गाचा नवीन आराखडा निश्चित केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुके आधीच…
छठ पूजेला जागतिक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज
बिहारच्या संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक असलेला छठ महापर्व आता जागतिक मान्यतेच्या उंबरठ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रचारसभेत बोलताना, छठ पूजेला युनेस्कोच्या “अमूर्त सांस्कृतिक वारसा” दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “छठ पूजा हा केवळ…
भारत अफगाणिस्तान संबंध अधिक मजबूत – बग्राम हवाईतळामुळे पाकिस्तानात गोंधळ
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात अधिक दृढ होताना दिसत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढत आहे. दरम्यान, भारताला ताजिकिस्तानमधील आपले हवाईतळ बंद करावे लागल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने आपले बग्राम हवाईतळ भारताला सोपवले असल्याचा दावा सोशल मीडियावर जोरात प्रसारित होत आहे….
नोव्हेंबरपासून सरकारची भारत टॅक्सी सेवा सुरू होणार
भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीमध्ये सुरू…
गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा नवा आराखडा तयार
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी सर्च संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून आदिवासी भागात आरोग्यसेवेचा एक अभिनव नमुना उभा राहिला आहे. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत आता जंगलातही मोबाईल आरोग्य केंद्रांद्वारे नागरिकांना थेट…
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर–सातारा महामार्गावरील कामांना गती
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ऊस गाळप हंगाम लवकरच सुरू होणार असून, या काळात राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या महामार्गावरील भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. कराड…
शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार
महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यासाठीचा सविस्तर आराखडा पुढील पंधरा दिवसांत तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच प्रत्येक मळ्यानुसार कर्मचाऱ्यांची यादी अंतिम करून, त्या संदर्भातील अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महसूल मंत्री…
सोलापूर येथे महिला व बालविकास भवन उभारण्यास गती
महिला आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सोलापूर येथे महिला व बालविकास भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले….
महाराष्ट्रात शासकीय इमारतींसाठी सौर ऊर्जेचा नवा अध्याय
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या शासकीय कार्यालयीन इमारती आणि विश्रामगृहांवर सौर ऊर्जा संयंत्रणा बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असून, राज्याच्या अपारंपारिक ऊर्जा धोरण – 2020 अंतर्गत या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेमुळे विभागाच्या इमारतींवरील वीज…
दिव्यांग बांधवांच्या रोजगार व स्वउद्योगासाठी शासनाचा नवीन उपक्रम
दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत पुरविण्यापेक्षा त्यांना स्थिर रोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले आहे. दिव्यांग बांधवांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी शासन विविध योजना राबवत असून, राज्य सरकार या कार्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी…
आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. आयोग पुढील अठरा महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार असून, त्यानंतर नव्या…
अफगाणिस्तानशी व्यापार बंद – पाकिस्तानात भाजीपाल्याची तीव्र टंचाई
पाकिस्तानमध्ये सध्या महागाईने विक्रमी पातळी गाठली असून, सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. भाज्यांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून, विशेषतः टोमॅटोच्या दरांनी सर्व विक्रम मोडले आहेत. एक टोमॅटो तब्बल पंचाहत्तर रुपयांना मिळत आहे, तर प्रति किलो किंमत सहाशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोच्या किमतींत चारशे…
भारत सरकारच्या स्वच्छता अभियानाला नवी दिशा
भारत सरकारच्या ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेवर आधारित ‘स्वच्छता अभियान पाच’ या उपक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हे अभियान 31 ऑक्टोबर पर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. विविध मंत्रालये, शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण…
हवामान बदलामुळे मानवी आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जगभर वाढत असलेले तापमान, दुष्काळ, पूर आणि प्रदूषण यामुळे आता हवामान बदलाचे परिणाम थेट मानवी आरोग्यावर उमटू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘लॅन्सेट काउंटडाउन ऑन हेल्थ अँड क्लायमेट चेंज’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या 2025 च्या अहवालात या परिस्थितीबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. अहवालानुसार,…
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्रालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीत गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याचे उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन करून नाशिकचा…
राज्यात नवीन जहाज बांधणी व दुरुस्ती प्रकल्पांना गती मिळणार
महाराष्ट्र राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणी या क्षेत्रांसाठी स्वतंत्र धोरण तयार केले असून, त्यामुळे सागरी उद्योग आणि गुंतवणुकीसाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ या कार्यक्रमाअंतर्गत गोरेगाव येथील नेस्को…
राज्यातील लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन होणार
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या लोककलांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर आढावा…
राज्यात गरजेनुसार नवीन अंगणवाड्या सुरू होणार
राज्यातील बालविकास सेवेला गती देण्यासाठी आणि बालसंगोपन योजनांचा प्रभाव वाढविण्यासाठी ज्या भागात लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाडी केंद्रांची कमतरता आहे, त्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसेच, मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, असेही…
बेस्टच्या इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवे युग सुरू झाले आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम म्हणजेच ‘बेस्ट’च्या ताफ्यात आता पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल झाल्या आहेत. भविष्यात ‘बेस्ट’चा संपूर्ण ताफा म्हणजेच शंभर टक्के बसगाड्या पर्यावरणपूरक असतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत…