
रत्नागिरी शहरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर असणारा भाट्ये समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावरील संध्याकाळ पर्यटकांनी गजबजलेली असते. नैसर्गिक सौंदर्याने भारलेला हा सरळ समुद्रकिनारा अंदाजे 1.5 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे किनाऱ्यावरून दूरवर चालत जाण्याचा आनंद आपण घेऊ शकता.
या समुद्रकिनाऱ्यावरून, आपण भाट्ये किनाऱ्याच्या पुढे प्रसिद्ध ‘मांडवी’ समुद्रकिनारा पाहू शकता. वैशिष्ट्य म्हणजे हे 2 किनारे एका खाडीने वेगळे केले आहेत. रत्नागिरी दीप गृह येथून दिसते. कोकण कृषी विद्यापीठाचे नारळ संशोधन केंद्र भाट्ये समुद्रकिनाऱ्यासमोर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या टोकावर असलेले प्रसिद्ध गणेश मंदिरदेखील पाहण्यासारखे आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पोट भरण्यासाठी अनेक छोटी दुकाने आहेत.
मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी जेट्टी, गुहागर समुद्रकिनारा, पूर्णगड किल्ला, थिबा पॉइंट, थिबा पॅलेस आणि राम मंदिर ही जवळपासची काही आकर्षणे आहेत. भाट्ये समुद्रकिनाऱ्यापासून 5 किलोमीटर प्रवास करण्यास तयार असाल, तर रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री देवी भगवती मंदिर, गणेशगुळे किनारा आणि टिळक अली संग्रहालयसुद्धा पाहू शकता. पावस येथील स्वरूपानंद स्वामी आश्रम येथून 12 किमी अंतरावर आहे. येथील हवामान वर्षभर मस्त असते. येथे जाण्यासाठी रत्नागिरी बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर उतरून जावे लागेल.