
देशभरात 1 जुलै 2025 पासून व्यावसायिक वापरासाठी असणाऱ्या एकोणीस किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घोषित केलेल्या नव्या दरांनुसार सिलिंडरचे दर एकोणसाठ रुपये पन्नास पैशांनी कमी करण्यात आले आहेत. ही दर कपात आजपासून लागू झाली असून व्यावसायिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामान्य ग्राहकांसाठी वापरला जाणारा चौदा दशांश दोन किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर मात्र पुन्हा एकदा महागाच राहिला आहे. या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती सिलिंडरचा दर सध्या आठशे बावन्न रुपये पन्नास पैसे एवढाच आहे.
मुंबई आता दर एक हजार सहाशे सोळा रुपये पन्नास पैसे, दिल्लीत दर एक हजार सहाशे पासष्ट रुपये, कोलकाता दर एक हजार सातशे एकोणसत्त्याऐंशी रुपये, चेन्नईत दर एक हजार आठशे तेवीस रुपये पन्नास पैसे आहे. हे दर कपात एप्रिलपासून सलग चौथ्यांदा करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये एकोणचाळीस रुपये, मे महिन्यात चौदा रुपये पन्नास पैसे, आणि जूनमध्ये चोवीस रुपये इतकी कपात झाली होती.
व्यावसायिक सिलिंडरच्या दर कपातीचा थेट फायदा हॉटेल्स, खानावळी, किरकोळ व्यवसाय, ढाबे, आणि लघुउद्योग यांना होणार आहे. त्यांचा दरमहा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, घरगुती वापरकर्त्यांसाठी कोणतीही दिलासादायक घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकाच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता अद्यापही कायम आहे.