कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक नियोजन
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून कोट्यवधी भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षित व सुलभ वाहतूक, निवास, भोजन, आरोग्यसेवा आणि गर्दीचे नियोजन यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या….
निसार सात नोव्हेंबरपासून कार्यरत – आपत्ती व्यवस्थापनात मिळणार मदत
इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेतील निसार उपग्रह सात नोव्हेंबरला कार्यान्वित होईल. निसारमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हा उपग्रह नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती प्रदान करेल. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळेल. ३० जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून…
अमेरिकेची अण्वस्त्र मिसाईल – मिनिटमॅन तीनची यशस्वी चाचणी
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने कॅलिफोर्नियातील व्हॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून निशस्त्र मिनिटमॅन-तीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. हे क्षेपणास्त्र सुमारे चार हजार दोनशे मैलांचे अंतर पार करत मार्शल द्वीपसमूहाजवळील रोनाल्ड रीगन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डिफेन्स टेस्ट साइट येथे लक्ष्यावर उतरले. या प्रक्षेपणाद्वारे अमेरिकेच्या क्षेपणास्त्र…
जागतिक क्रमवारीत भारतीय शैक्षणिक संस्थांची घसरण
लंडनमधील क्वाक्वेरेली सायमंड्सम्हणजेच क्यूएस यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. या यादीत भारतातील फक्त सात संस्थाच स्थान मिळवू शकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातील प्रमुख संस्थांच्या क्रमवारीमध्ये खासकरुन आयआयटीच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आयआयटी दिल्ली आणि…
भारताच्या निर्यातबंदीने बांगलादेशात कांद्याच्या दरात मोठी वाढ
भारतातून कांद्याची निर्यात अचानक थांबवण्यात आल्याने शेजारील बांगलादेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होत असून, सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारत हा बांगलादेशाला सर्वाधिक कांदा पुरवठा करणारा देश असल्याने निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका या देशाला बसला आहे. भारताने देशांतर्गत…
मुनस्यारी बनले गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी नवे आकर्षणकेंद्र
उत्तराखंडमधील मुनस्यारी हे हिमालयातील शांत व समृद्ध पर्वतीय गाव पर्यटनप्रवाशांसाठी नव्या आकर्षणासह उभे आहे. या भागातील नैसर्गिक सौंदर्य, बर्फाच्छादित रांगा आणि पवित्र नद्यांचा प्रवाह ट्रेकिंग प्रेमींना “मिनी काश्मीर”ची अनुभूती देत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन हजार ते तीन हजार मीटर उंचीवरील हे ठिकाण अद्वितीय दृश्यांसह…
फ्रान्समध्ये जगातील पहिला चार्जिंग महामार्ग तयार
फ्रान्सने जगातला पहिला चार्जिंग हायवे तयार केला आहे, जो गाड्या चालू असतानाच त्यांना वायरलेस पद्धतीने चार्ज करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे रस्ते आता ऊर्जा पुरवठादार म्हणून काम करणार आहेत आणि वाहनं स्वतःच चार्ज होतील. सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे, परंतु चार्जिंग स्टेशनची कमतरता ही…
भारतीय वायुसेनेत अधिकारी होण्याची संधी – नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
भारतीय वायुसेनेने तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. “वायुसेना प्रवेश परीक्षा २०२५” साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, देशभरातील पात्र युवक-युवतींना हवाई शाखा आणि भूमिगत तांत्रिक सेवांमध्ये भरतीची संधी मिळणार आहे. देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक प्रतिष्ठित आणि सन्मानाची कारकीर्द ठरणार आहे….
हार्बर रेल्वेमार्गावर दोन नवीन रेल्वे स्थानकं – प्रवाशांना दिलासा
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बेलापूर – उरण मार्गावर प्रवाशांसाठी दोन नवीन स्टेशन आणि दहा वाढीव लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. यामुळे नवी मुंबई आणि आजबाजूच्या भागातील प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या बेलापूर – उरण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना दुहेरी भेट दिली आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत…
हवामानातील बदल आणि शहरीकरणाने पक्ष्यांचे अधिवास धोक्यात
दरवर्षी हिवाळ्याच्या सुरूवातीला सायबेरिया, युरोप आणि आफ्रिकेतील विविध देशांमधून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे ठाणे आणि कल्याण परिसरात येत असतात. भोपर, कोपर, सातपूल आणि उंबार्ली टेकडी परिसर हे या पक्ष्यांचे पारंपरिक अधिवास ठरले आहेत. मात्र, यंदा हवामानातील बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे या भागात पक्ष्यांची उपस्थिती लक्षणीयरीत्या घटली…
चक्रीवादळानंतर राज्यात पुन्हा पावसाचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची सतत हजेरी लागलेली असून, नोव्हेंबर महिना सुरु होऊनही पावसाचा जोर कायम आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने नवा इशारा दिला असून, पुढील तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस…
राज्यात नवी विषाणू संशोधन संस्था उभारली जाणार
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नव्या प्रकारच्या विषाणूंवर संशोधन करणारी स्वतंत्र संस्था राज्यात स्थापन होणार आहे. अलीकडच्या काही वर्षांत सतत उद्भवणाऱ्या विषाणूजन्य आजारांमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून त्यावर वेळेत उपाययोजना करता याव्यात, यासाठी या संशोधन…
महाराष्ट्रातील दुर्गम भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवेला नवी दिशा
राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्गम गावांपर्यंत जलद गतीचा इंटरनेट संपर्क उपलब्ध होणार असून, हा उपक्रम राज्याच्या डिजिटल विकासाला नवसंजीवनी…
आचारसंहितेच्या काळात धोरणात्मक निर्णयांसाठी आयोगाची परवानगी अनिवार्य
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाच्या कारभारावर काही निर्बंध आले असले, तरी काही आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्याची मर्यादित मुभा शासनाला दिली गेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या असून, शासनाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेच्या चार दिवस आधीपर्यंत असे निर्णय…
महाराष्ट्राची न्यायालयीन प्रगती देशासाठी आदर्श – सरन्यायाधीश गवई
नवी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसच्या भूमिपूजन सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महाराष्ट्राच्या न्यायालयीन पायाभूत सुविधांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे सर्वात प्रगत आणि सुबक सुविधा असलेले राज्य आहे. न्यायालयीन इमारती, तंत्रज्ञानाचा वापर, तसेच…
एसटीमध्ये महिला सुरक्षेसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता थेट आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच आयपीएस अधिकारी एसटी महामंडळाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या घटनेमुळे एसटी…
अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर सीसीटीव्ही बसवणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास एक हजार पाचशे कॅमेरे समृद्धी महामार्गावर…
नाशिक कुंभमेळयासाठी अंतर्गत रिंगरोडला मंजूरी
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्याच आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांची समितीने नाशिकमध्ये सहासष्ट किलोमीटर लांबीची अंतर्गत रिंग रोड तयार करण्यास मान्यता दिली आहे. कुंभमेळ्यासाठी सात मार्गांनी येणाऱ्या भाविकांची वाहतूक सुलभ करणे आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळणे, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे….
एअर इंडियाचा सर्व्हर ठप्प झाल्याने विमान प्रवाशांची गैरसोय
देशातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत सापडली आहे. आज दुपारी अचानक कंपनीचा सर्व्हर बंद पडल्याने देशभरातील विमानतळांवर उड्डाणांना मोठा विलंब झाला. विशेषतः दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. सर्व्हर डाऊन झाल्याने चेक-इन, बोर्डिंग पास, सामान जमा करण्याची…
न्यूयॉर्कच्या महापौरपदाचा मानकरी ठरला भारतीय वंशाचा तरुण
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचा तरुण नेता झोहरान ममदानी यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे. लोकशाही पक्षाचे उमेदवार असलेल्या ममदानी यांनी महापौरपद जिंकून जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवला आहे. त्यांचा हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून सामाजिक मूल्ये, मेहनत आणि विविधतेचा गौरव…
केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टीचा कहर
उत्तराखंडमधील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे म्हणजे केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे आज दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. सकाळपासूनच हिमालयीन पर्वतरांगांवर दाट ढग जमा झाले होते आणि बर्फाचे कण बरसू लागले. काही तासांतच या पवित्र स्थळांनी शुभ्र चादर पांघरलेली आहे. त्यामुळे परिसरातील तापमान झपाट्याने खाली आले…
अमेरिकेची मोठी कारवाई – रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध
अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादत मोठा निर्णय घेतला आहे. रशियाकडून होणारी तेल निर्यात मर्यादित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. अमेरिका भारतासह अनेक देशांवर रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा दबाव टाकत आहे. तथापि, भारत, चीन…
भारतामध्ये विषाणूजन्य संसर्गात झपाट्याने वाढ
भारतात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या 2025च्या वार्षिक अहवालात या बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. देशभरातून तपासण्यात आलेल्या चार लाख पंच्याहत्तर हजाराहून अधिक नमुन्यांपैकी अकरा टक्के नमुन्यांमध्ये विषाणूंचा संसर्ग आढळला आहे. या वाढत्या प्रमाणामुळे सार्वजनिक…
चीनने अमेरिकन वस्तूंवरील अतिरिक्त आयातशुल्क हटवले
चीनने अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दक्षिण कोरियात झालेल्या उच्च-स्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका इतर देशांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील अमेरिकन…
दिल्लीमध्ये विषारी धुक्याचा कहर – डोळ्यांच्या आजारांमध्ये वाढ
दिल्लीमध्ये वाढत्या विषारी धुके आणि प्रदुषित हवेमुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये सुमारे साठ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. हवेतील कण रासायनिक वायू, धूळ आणि इतर प्रदूषकं डोळ्यांवर विपरीत परिणाम करत आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये दिवाळीनंतर हवा प्रदूषण पातळी गंभीर…