नोकरी सोडून शेतीतून लाखोंचा नफा
बदललेले तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग करून पाहण्याची हौस याच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते या तरुणाने कोरफडीचे उत्पादन घेतले. खेमराज औषध निर्मिती कंपनीमध्ये नोकरीला होता. नोकरी करताना वडिलोपार्जित जमिनीत काहीतरी नवीन करून बघण्याच्या इच्छेने त्याने कोरफडीची लागवड केली. त्यातील नफा बघता त्याने नोकरी…
महाराष्ट्रात काश्मिरी केशराचे उत्पादन
केशराचे पीक मुख्यतः काश्मीर राज्यामध्येच मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशराचे यशस्वी उत्पादन घेण्याचा प्रयोग पुण्यात करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शैलेश मोडक या तरुणाने भन्नाट प्रयोग केला आहे….
खनिज संपत्तीचे उद्योगातील योगदान
अवजड उद्योगामध्ये योगदान देणारी खनिजसंपत्तीमहाराष्ट्रातील उदयोग क्षेत्रात खनिजसंपत्तीचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील सर्वसाधारण बारा जिल्ह्यांमध्ये लहानमोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीस मोठा हातभार लागत आहे. पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. पूर्व…
एक गाव-एक गणपती
गणेशोत्सव म्हणजे एक आनंदी सोहळा असतो. काही ठिकाणचे गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. अनेक ठिकाणी आजही सामूहिकरित्या श्री गणेश पूजन केले जाते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगावमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविली जाते. येथील ग्रामस्थ असा सामूहिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आसनगाव येथील सूर्यवंशी क्षत्रिय समाज…
वानखेडे स्टेडियमवर रोज सचिन भेटणार
मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि शतकवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यातील खास नात्याविषयी अधिक काही सांगायला नको ! त्याबाबत सगळेच परिचित आहेत. आपल्या शैलीने सचिनने हे स्टेडियम एके काळी गाजवले आहे. त्याचेच स्मरण म्हणून या स्टेडियमवर आता सचिनचे शिल्प साकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर, २०२३ ला या…
महंमद झिया यांचे प्राणिप्रेम
वाघाच्या बछड्यांचे संगोपन करणे म्हणजे किती अवघड काम असेल ! वाघ म्हटले तरीही भीतीने अंगावर शहारे येतात ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील एक कर्मचारी प्रेमाने बछड्यांचे संगोपन करताना दिसतात. हे प्राणिसंग्रहालय ‘वाघांचे प्राणिसंग्रहालय’ म्हणून ओळखले जाते. या प्राणिसंग्रहालयातील एका व्यक्तीने आतापर्यंत वाघांच्या २६ बछड्यांचे संगोपन…
सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचा आदर्श
सिंधुदुर्गातील जिल्हा कारागृहातील कैद्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. या कारागृहातील बंदिवानांनी भाजीपाला लागवड केली आहे. कारागृहाच्या आतील परिसरामधील दोन एकर क्षेत्रामध्ये या कैद्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. याठिकाणी मुबलक प्रमाणावर असलेल्या जमिनीवर लागवड करण्याचा निर्णय् घेण्यात आला. खुल्या कारागृहातील बंदी अहोरात्र या लागवडीसाठी…
समुद्रातील द्वारका पाहण्याची सुवर्णसंधी
गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर पर्यटकांना दाखविणार आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी तीनशे फूट खालवर असलेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने पाच हजार वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका नगरी शोधून काढली आहे….
सिंधुदुर्गातील गावपळण
सिंधुदुर्गात गावपळण ही एक पारंपरिक प्रथा आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात ही प्रथा सुरू आहे. सध्या या गावातील गावपळणीला सुरुवात झाली आहे. आता हे गाव पाच दिवस निर्मनुष्य असणार आहे. येथील ग्रामस्थ पाच दिवस वेशीबाहेर वसणार आहेत. हा गाव चारशे पन्नास वर्षांची परंपरा जपत आहे….
विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे आकर्षण
अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच या पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी ठाणे शहरात नुकत्याच झालेल्या एका चर्चासत्रात शहरातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिकवणी वर्गांचे संचालक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भयानक सत्य मांडले. विद्यार्थ्यांच्या दफ्तरांमध्ये गुटखा पाकिटे, पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी, ई-सिगारेट आढळत असल्याचे त्यांनी उपस्थित…
अंबरनाथमधील शिवमंदिर
ठाण्यातील अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर आता कात टाकणार आहे. मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १५० कोटींचा प्रकल्प राबविला जात आहे. या पुरातन मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभाग खडबडून जागा झाला असून मंदिराची झीज थांबविण्यासाठी काम सुरू केले आहे. मंदिरावरील शिल्पांची झीज थांबविण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा…
ओशिवरा नदी वाचवा
मुंबईतील ‘ओशिवरा’ नदी प्रदूषित होत आहे. या प्रवाहात कारखान्यातील टाकाऊ माल सातत्याने टाकला जात असल्याचे स्थानिकांना आढळून आले आहे. येथे सीसीटीव्ही कधी बसवले जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्हीमुळे नैसर्गिक स्थळांची होणारी हानी थांबू शकेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईमध्ये…
पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा
नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा म्हणजे विलक्षण आकर्षण असते. रामनवमीला ही यात्रा निघत असते. ती पाहण्यासाठी विदर्भासह शेजारील राज्यांतूनही नागरिक येत असतात. यावर्षी रामनवमीला १७ एप्रिल रोजी मंदिरातून शोभायात्रा दुपारी ४ वाजता निघणार आहे. या शोभायात्रेत १०८ मंगलकलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या कन्या दिसतील. पौराणिक प्रसंग…
पुण्याच्या लेकीची यशाला गवसणी
पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील वडापुरीची सिमरन ब्रम्हदेव थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर झाली आहे. वडापुरी येथे एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. सिमरनने आतापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती वडील ब्रह्मदेव, आई आशा…
शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग
माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी ‘शेतकरी दिन’ साजरा केला जातो. 30 मार्च 2024 रोजी त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. ”ग्रामीण आणि शहरी भारत ही दोन भिन्न जगे आहेत. ग्रामीण जनताच खरा भारत आहे, ” असे भारताचे…
लायन्स क्लबची कन्यादान योजना
अलिकडे विवाह समारंभांवर अमाप उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येतील लोकांना साध्या पद्धतीने विवाह करणेही मुश्किलीचे असल्याचे चित्र या समाजात दिसते. ‘लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट’ या संस्थेतर्फे समाजातील अशा गरजवंतांसाठी कन्यादान योजना राबविली जात आहे. येत्या २ मे रोजी या माध्यमातून आदिवासी…
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!