तांत्रिक बिघाडामुळे जगभरात चॅटजीपीटी सेवा ठप्प

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित लोकप्रिय सेवा चॅटजीपीटी सोमवारी संध्याकाळपासून तांत्रिक कारणांमुळे ठप्प झाली आहे. या अचानक झालेल्या बिघाडामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. ही सेवा चालवणाऱ्या ओपन एआय संस्थेने तांत्रिक बिघाडाची कबुली दिली असून, सेवा पूर्ववत करण्याचे का म युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाहीर केले आहे.

चॅटजीपीटी वापरणाऱ्या अनेकांना चॅट उघडण्यात समस्या येत असल्याचे दिसून आले. काही जणांना संवाद सुरु होताच अ‍ॅप किंवा वेबसाईट बंद होत असल्याची तक्रार होती. ही अडचण केवळ वैयक्तिक युजर्सपुरती मर्यादित न राहता, प्रो युजर्स, व्यावसायिक, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रांनाही मोठा फटका बसला आहे. “चॅटजीपीटी सेवेमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, आम्ही यावर तातडीने काम करत आहोत. वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.”

ओपन एआय ने सेवा पूर्ववत होण्याची नेमकी वेळ जाहीर केलेली नसली, तरी काही युजर्सना हळूहळू प्रवेश मिळत असल्याचे संकेत मिळाले आहेत. कंपनीने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही युजरचा डेटा गमावलेला नाही आणि सर्व्हर स्थिरतेवर काम सुरू आहे. चॅटजीपीटी ही केवळ एक चॅटबॉट सेवा न राहता, आज अनेकांसाठी कामाचा महत्त्वाचा आधार बनली आहे. त्यामुळे तिची सेवा ठप्प होणे ही एक मोठी घटना ठरली आहे. ओपन एआय लवकरात लवकर सेवा पूर्ववत करेल, अशी अपेक्षा सर्व युजर्सकडून व्यक्त केली जात आहे.







494,160