
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एक उल्लेखनीय ठिकाण आहे. मुख्य आकर्षणांपैकी हे एक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयापासून नेहरू बाल उद्यान जवळ आहे. हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे.
मराठा साम्राज्यातील शासकांची शस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 500 वर्षे जुना युद्धाचा पोशाख, 400 वर्षांची जुनी पैठणी साडी, औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेली कुराणाची प्रत येथे पहायला मिळते. अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गोष्टी येथे पहायला मिळतात. जुनी शस्त्रे, प्राचीन रायफल, तलवारी, ढाली आणि मुघलांना पराभूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती येथे पहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची अनेक जुनी चित्रे येथे आहेत.
हे संग्रहालय आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 10.30 वाजल्यापासून संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत खुले असते. येथे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक व विमानतळ जवळ आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने या संग्रहालयाची स्थापना केली. या इमारतीत एकूण 6 प्रदर्शन सभागृह आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग येथे हे संग्रहालय आहे. औरंगाबादमधील महत्व्मपूर्ण पर्यटनस्थळांपैकी हे एक ठिकाण आहे. मात्र आज जाण्यासाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाते.