📰 उपसंपादक
📌 जबाबदाऱ्या
विशेष बातम्यांची निवड
माहितीची तथ्यतपासणी
शीर्षक व उपशीर्षक निश्चित करणे
विषयानुसार प्रतिमा मिळवणे
व्याकरणासह संपूर्ण मजकूर सुसंगत करणे
विहीत लेखनशैलीत मांडणी करणे
निर्धारित वेळेत बातम्या पोर्टलवर प्रसिद्ध करणे
💻 कौशल्ये
उत्कृष्ट लेखन, व्याकरण व टंकलेखन
Word व Excel वापरात प्राविण्य
माहिती संकलन व विश्लेषणात हातखंडा
रचना, मांडणी आणि रंगसंगतीचे ज्ञान
कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर किंवा शिकण्याची तयारी
वेळेचे पक्के नियोजन व उत्तम संघकार्य
CMS (WordPress), SEO चा अनुभव
🏅 पात्रता
मराठी भाषा, मराठी माणूस व मराठी मुलुखाचा जाज्वल्य अभिमान
पत्रकारितेचा उपयोग मराठी समाजासाठी करण्याची तळमळ
गरजू व दुर्बळांबद्दल सक्रिय आत्मीयता
समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाणीव
प्रामाणिक । नम्र । वक्तशीर । कामसू । कार्यनिष्ठ
सतत शिकण्याची जिज्ञासा आणि तांत्रिक प्रगतीची तयारी
संघकार्य आणि नेतृत्व यांचा समतोल साधण्याची क्षमता
आठवड्याचे पूर्ण सात दिवस काम
प्रत्येकाला आवर्तनाने एक दिवस साप्ताहिक सुट्टी
साधारण सत्र सकाळी 9:00 ते सायं. 6:00
सकाळचे पूर्ण सत्र : सकाळी 6:00 ते दुपारी 3:00
सकाळचे अर्ध सत्र : सकाळी 6:00 ते सकाळी 11:00
दुपारचे पूर्ण सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 12:00
दुपारचे अर्ध सत्र : दुपारी 3:00 ते रात्री 8:00
शनिवार, दि. 9 ऑगस्ट : रक्षाबंधन । दूपारनंतर अर्धा दिवस
शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
बुधवार, दि. 27 ऑगस्ट : श्री गणेश चतुर्थी
शनिवार, दि. 6 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर : विजयादशमी, दसरा
मंगळवार, दि. 21 ऑक्टोबर : श्री लक्ष्मी कुबेर पूजन । दूपारनंतर अर्धा दिवस
बुधवार, दि. 22 ऑक्टोबर : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर : भाऊबीज । दूपारनंतर अर्धा दिवस
रजेवर जाण्यापूर्वी ती सात दिवस आधी मंजूर करून घेणे गरजेचे
आजारपण, अपघात, निधन या कारणांना या नियमातून काही अटींसह सूट
पहिल्या वर्षी पगारी रजा नाहीत
एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षाला सहा पगारी रजा
प्रत्येक महिन्यातील एक ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंतचे मानधन, वेतन किंवा देयके पुढील महिन्याच्या दहा तारखेला अदा केली जातात.
मानधन, वेतन किंवा देयकांवर आगाऊ उचल देण्यात येत नाही.
करारावरील सेवा पुरवठादारांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस आपली देयके निर्धारीत दरानुसार, विहित नमुन्यात ईमेलवर पाठविणे गरजेचे आहे.
पाच तारखेनंतर आलेली देयके पुढील महिन्यात अदा केली जातात.
कार्यालयाने सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त कामांची देयके आल्यास, ती अदा केली जात नाही.
कार्यालयीन सुविधा
कामकाजाचे वेळापत्रक
व्यावसायिक वाढीच्या संधी
मानधन आणि प्रोत्साहन
सहकार्य आणि व्यावसायिक ओळख
शिकण्याची संधी
मूल्याधारित संस्था संस्कृती
अतिरिक्त लाभ व उपक्रम
🤝 मानधन संरचना - प्रति पोस्ट 💰
दैनिक पोस्ट
बातमी
अभ्यासपूर्ण सदर
📌 नियम, अटी व शर्ती
विहित नमुन्यातील कार्यप्रवाहाप्रमाणे मजकूर व पोस्टची निर्मिती आवश्यक.
ठरवून दिलेल्या वेळेत पोस्टिंग होणे आवश्यक. उशिरा झालेल्या प्रत्येक पोस्टसाठी रु. 10/- दंड आकारला जाईल.
कॉपी-पेस्ट किंवा साहित्यचौर्य (Plagiarism) आढळल्यास मानधनास पात्र राहणार नाही.
प्रत्येक पोस्टमध्ये शीर्षक, उपशीर्षक, टॅग आणि ठरवून दिलेल्या आकारातील प्रतिमा अनिवार्य आहे.
पोस्टिंगपूर्वी प्रतिमेतील सर्व जुने गुणधर्म (Properties) व तपशील (Details) वगळून, त्या प्रतिमेला पोस्टच्या इंग्रजीतील स्लगनुसार फाईल नाव देणे आवश्यक आहे.
पोर्टल किंवा समाजमाध्यमांवर पोस्टिंग झाल्यानंतर पोस्ट तपासणी अनिवार्य आहे.
शुद्धलेखन आणि SEO तपासणी करणे बंधनकारक आहे.
महिन्यातील तीन चुका झाल्यानंतर, त्यापुढील प्रत्येक चुकीसाठी रु. 10/- दंड आकारला जाईल.
ठरवून दिलेल्या पोस्टिंगव्यतिरिक्त अतिरिक्त पोस्टिंगसाठीच्या विषयांना संपादकीय विभागाची ई-मेलवरील लेखी पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
सर्वसाधारण सेवा करारनामा
(यात पदानुसार वेळा व इतर संदर्भांचा बदल असू शकतो)
कालावधी दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (तारीख) – (महिना) – (साल)
हा सेवा पुरवठा करार दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)
रोजी
सह्याद्री मराठी,
२०८, साई सदन, ७६/७८, मोदी स्ट्रीट,
मॉडर्न हॉटेलसमोर, फोर्ट, मुंबई – ४००००१.
ई-मेल : sahyadrimarathi@gmail.com | दूरध्वनी क्रमांक : 022 4962 0900 | वॉट्सअप क्रमांक : +91 77750 55900
(सेवा स्विकारणार)
आणि
सेवा पुरवठादाराचे नांव, पत्ता, ई-मेल आणि संपर्क क्रमांक
(सेवा पुरवठादार)
यांच्यात परस्पर सहमतीने केला जात आहे.
सेवा कराराचे नियम व अटी
हा दस्तऐवज व अटी, शर्ती व नियम ‘सेवा करार’ म्हणून मान्य असतील. सेवा पुरवठादारांनी या दस्तऐवजाच्या शेवटी दिलेल्या जागी स्वाक्षरी करून संस्थेच्या अटी, शर्ती व नियम पाळण्याची खात्री द्यावी.
सेवा प्रारंभ (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) | सेवा समाप्ती (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल)
कार्यस्थळ:
वरील पत्त्यावरील संस्थेचे कार्यालय, मुंबई / किंवा घरुन काम, यापैकी जे ठरले आहे ते / संस्थेच्या आवश्यकतेनुसार बदली शक्य. आवश्यकता भासल्यास परदेश प्रवासही आवश्यक.
पदनाम व जबाबदाऱ्या
पद: सहकारी ग्राफिक डिझायनर.
मुख्य जबाबदाऱ्या: संलग्न जोडपत्रकानुसार.
सेवा स्थिती
पूर्ण वेळ सेवा पुरवठादार (Full-time)
परिविक्षाधीन कालावधी (Probation) कालावधी:
(वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) ते (वार) , दिनांक (तारीख) – (महिना) – (साल) (साधारण ६ महिने)
पुनरावलोकन:
मानव संसाधन विभाग कामगिरीचे पुनरावलोकन करून ठरवेल की सेवा कायम ठेवायची की नाही. समाधानकारक कामगिरी असेल तर कायम नियुक्तीपत्र दिले जाईल. प्रशिक्षण काळात सवलतीच्या रजा मिळणार नाहीत.
कार्यालयीन वेळ व साप्ताहिक सुट्टी:
- सोमवार ते शनिवार: सकाळी ९ ते सायंकाळी ६
- हजेरी वेळ: सकाळी ८:४५ व सायंकाळी ६:१५
- दुपारचे जेवण: १:३० ते २:०० (३० मिनिटे)
- चहा वेळ: १०:१५ ते १०:३० व ४:०० ते ४:१५ (१५ मिनिटे)
- जादा वेळ आणि काम (ओव्हरटाईम): लागू नाही
- साप्ताहिक सुट्टी: रविवार
मानधन व लाभ:
- मानधन देय तारीख: प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला.
- अगाऊ उचल: दिली जात नाही.
- वाढ व लाभांश: किमान 95% उपस्थिती अनिवार्य.
- संस्थेच्या धोरणानुसार व सेवा पुरवठादाराच्या कामगिरीवर आधारित.
रजा व इतर सुट्ट्या:
- संस्थेत एक वर्ष पूर्ण होईपर्यंत पगारी रजा नाहीत.
- साधी बिनपगारी रजा: किमान दहा दिवस आधी लेखी किंवा ई-मेल द्वारे विनंती करणे आवश्यक.
- ती सात दिवस आधी मंजूर करुन घेणे गरजेचे.
- मंजुरीशिवाय रजा घेतल्यास १ दिवसाच्या बदल्यात २ दिवसांचे मानधन कपात.
- मानव संसाधन विभागाने पोर्टलवर जाहिर केलेल्या यादीनुसार पालन आवश्यक.
- आजारी रजा: सकाळी नऊ वाजण्यापूर्वी hr.sahyadrimarathi@gmail.com या ई-मेलवर, व्यवस्थापक, विभागप्रमुख व मा. मुख्य संपादक यांना कळविणे आवश्यक.
- तीन दिवसांपेक्षा अधिक असल्यास डॉक्टरचे प्रमाणपत्र, औषधांची चिठ्ठी व औषधांच्या देयकांची प्रत आवश्यक.
- सेवापुरवठादाराची मंजूरी शिवाय सात दिवसांपेक्षा अधिक सुट्टी असल्यास सेवा पुरवठा बंद केला असे मानून कराराच्या अटी शर्तींनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
इतर रजा:
- दया रजा (Compassionate leave): व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून.
- गर्भावस्था / पितृत्व रजा:
- स्त्रिया: एकूण ६ महिने (३ महिने आधी + ३ महिने नंतर), वेतनविरहित
- पुरुष: व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार
गोपनीयता करार (NDA – नॉन-डिस्क्लोजर):
- संस्थेच्या संवेदनशील माहितीचे संरक्षण आवश्यक.
- गोपनीय माहिती उघड केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र.
बौद्धिक संपदा हक्क:
- सेवा पुरवठादाराने तयार केलेले सर्व दस्तऐवज, संकल्पना, रचना, संकेतांक यांचे हक्क संस्थेचे राहतील.
स्पर्धाविरोधी आणि ग्राहक पळविणे टाळणे:
- स्पर्धा प्रतिबंध: 2 वर्षांपर्यंत स्पर्धक संस्थांमध्ये नोकरी व स्वत:चा व्यवसाय करता येणार नाही. इतर व्यवसायात भागीदार किंवा तत्सम सहभाग घेता येणार नाही. (निर्धारित वेळेची पूर्वसूचना न देता नोकरी किंवा सेवा पुरवठा बंद केल्यास ही अट लागू होते).
- ग्राहक पळविणे: ग्राहक, कर्मचारी यांना आपल्या सोबत नेल्यास कायदेशीर कारवाई व दंड.
तक्रार निवारण:
- सेवा पुरवठादारांच्या योग्य तक्रारी प्राधान्याने आणि तातडीने सोडवल्या जातील.
सेवा समाप्ती अटी:
- नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ सेवा समाप्ती किंवा निलंबन.
- शिस्तभंग प्रक्रियेत –
- तोंडी इशारा
- लेखी इशारा
- अंतिम लेखी इशारा
- सेवांत
- कामाची गरज पूर्ण झाल्यावर पूर्वसूचना न देता संस्थेकडून सेवा समाप्त करता येईल.
आचारसंहिता:
- वेशभूषा: स्वच्छ, औपचारिक पोशाख आवश्यक.
- व्हॉट्सअॅप सेटिंग: Read receipts ON, Last seen enabled, Online enabled.
- फोन वापर:
- कार्यालयीन वेळेत वैयक्तिक दूरध्वनी वापरास बंदी.
- चहा व जेवणाच्या सुट्टीत वैयक्तिक भ्रमणध्वनी वापरास परवानगी.
- आपत्कालीन स्थितीत जवळच्या नातेवाईकांना कार्यालयात संपर्क साधण्यासाठी परवानगी.
- नियम तोडल्यास अर्थिक दंड, लाभांशापासून, पगारवाढ व इतर सुविधांपासून वंचित.
सोशल मीडिया व ईमेल:
- कार्यालयीन यंत्रणेवर वैयक्तिक समाज माध्यमे व ई-मेल वापरास मनाई.
- फक्त अधिकृत ईमेलद्वारेच कार्यालयीन व्यवहार.
- पासवर्ड बदलणे, नवीन सॉफ्टवेअर, ॲप डाऊनलोड करण्यास मनाई.
- उल्लंघनास दंड व शिस्तभंग कारवाई.
राजीनामा सूचना कालावधी: अगाऊ सुचना महिन्याच्या एक तारखेपासून.
- कंत्राटी, करारावर किंवा कायम: २ महिने.
- वरिष्ठ पदासाठी: 3 महिने.
- या अटी न पाळल्यास ३ महिन्यांचे वेतन / मानधन किंवा ₹३ लाख रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल तो दंड.
- कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय सुचना कालावधी कमी अथवा जास्त करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव.
स्वार्थसंबंध टाळणे:
- नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होईल.
विवाद निवारण:
- मुंबई महानगर दंडाधिकारी (फोर्ट) न्यायालय अधिकार क्षेत्रांतर्गत
- मध्यस्थी व लवादाद्वारे निवारण
माहिती गोपनीयता:
- कायदेशीर मागणीशिवाय वैयक्तिक माहिती उघड केली जाणार नाही.
करारात बदल:
- सर्व बदल लेखी असले पाहिजेत व दोन्ही पक्षांनी स्वाक्षरी केलेली असावी.
पूर्ण करार:
- हा करार मागील सर्व चर्चा व कागदपत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे.
या करारातील सर्व नियम, अटी व शर्ती मी मान्य करतो आणि माझ्या सेवाकालात त्यांचे संपूर्ण पालन करेन.
सेवा पुरवठादार स्वाक्षरी: ___________________ संस्थेतर्फे स्वाक्षरी: _____________________
सेवा पुरवठादाराचे नांव: ____________________ नांव व पदनाम: _______________________
साक्षीदाराचे नांव: ________________________ साक्षीदाराची स्वाक्षरी: ___________________