कणकवली-सिंधुदुर्ग स्थानकांवर आठ गाड्यांचा थांबा-पर्यटनाला चालना

कोकण रेल्वेने कणकवली आणि सिंधुदुर्ग या पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या स्थानकांवर आठ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. सोबतच पर्यटकांना देखील या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. हा निर्णय स्थानिक प्रवाशांच्या आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जात आहे.

या निर्णयानुसार पुढील आठ गाड्यांना कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबा मिळणार आहे. यामध्ये पनवेल-सावंतवाडी एक्सप्रेस, मुंबई-हटिया लोकमान्य टिळक एक्सप्रेस, मंगलोर-मुंबई एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्सप्रेस, तिरुवनंतपूरम-लोकमान्य टिळक एक्सप्रेस, मंडोवी एक्सप्रेस, कुडाळ-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस अशा गाड्यांचा समावेश आहे. हे थांबे  सुरू कधीपासून होतील आणि त्याचे वेळापत्रक काय असेल, हे अद्याप घोषित झालेले नाही. रेल्वे प्रशासन लवकरच तारीख जाहीर करणार आहे.

कणकवली जवळ निसर्गरम्य समुद्रकिनारे, मंदिर तसेच अनेक किल्ले आहेत. हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहेत. येथून जवळच असलेल्या त्सुनामी बीच, तारकर्ली बीच, मालवण आणि देवबाग याठिकाणी स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससारखे अनुभव मिळतात. या दोन्ही ठिकाणी पर्यटन, समुद्र किनारी आनंद लुटण्यासाठी आणि स्थानिक जेवणासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. त्यामुळे ही स्थानकं कोकण भागातील महत्त्वाचे प्रवासी आणि पर्यटन केंद्र आहेत. कोकण रेल्वेच्या या निर्णयाचा फायदा पर्यटकांना होणार आहे. स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी अधिक सुलभता निर्माण करणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

या भागात विस्तृत रेल्वे थांबे नसणे किंवा थांब्यांची संख्या कमी असणे, प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते, त्यामुळे अनेक वर्ष ही मागणी केली जात होती. पर्यटन वाढवण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे कणकवली व सिंधुदुर्ग येथील प्रवासी सुविधांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मोठ्या गाड्यांवर थांबा मिळाल्याने प्रवास सोपा होईल. पर्यटन क्षेत्राला गती मिळू शकते, कारण लोक मोठ्या गाड्यांवरून थेट ये-जा करण्यास सक्षम होतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे व्यवस्थापनालाही प्रवाशांची संख्या व सेवा सुधारण्याचा फायदा होईल.






6,745 वेळा पाहिलं