हरमल समुद्रकिनारा

हरमल समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सुट्टीच्या दिवशी या किनाऱ्यांवर वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यावर एक वेगळे शांत वातावरण आहे. हा गोव्यातील एके काळी लोकप्रिय ‘हिप्पी’ किनारा होता. हरमल हा सफेदशुभ्र असा वाळूचा समुद्रकिनारा आहे. येथे खडकदेखील आहेत, हा गोव्यातील सर्वात सुंदर किनारा देखील आहे. योगाचे वर्ग घेण्यासाठी हरमल किनारा हे एक योग्य सुंदर ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्यावर ‘ड्रम सर्कल’ देखील आहे. हरमलमध्ये पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनाऱ्याच्या एका टोकाला गोड पाण्याचे सरोवर आहे जे पाहण्यासारखे आकर्षण आहे.

हा समुद्रकिनारा फेब्रुवारीमधील हरमल उत्सव किंवा ‘फ्रीक फेस्टिव्हल’ यांसारख्या उत्सवांसाठी देखील ओळखला जातो. ‘हरमल वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हल’ चे व्यवस्थापन मुख्यत्वेकरुन रशियाचे लोक करतात. समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक ‘स्ट्रीट मार्केट’ आहे. हरमल किनाऱ्यावरील जवळपास प्रत्येक ठिकाणी संध्याकाळी ‘फायर शो’ म्हणजे फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तेथे लोक शेकोटीचा आनंद घेतात. येथे झुंबा संगीतदेखील आहे. हरमलचे सूर्यास्त ड्रम सर्कल गोव्यात खूप लोकप्रिय आहेत. पॅराग्लायडिंगसाठी हरमल किनारा हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी हा किनारा सर्वोत्तम ठिकाण आहे. या किनाऱ्याला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. यावेळी हवामान खूप छान असते.

जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने खूप छान असतात. हरमल किनारा पणजीपासून सुमारे ३६ किमी अंतरावर आहे. पणजीपासून येथे जाण्यासाठी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सहज उपलब्ध असतात. हरमलला जाण्यासाठी राज्याच्या कोणत्याही भागातून भाड्याने बाईकदेखील घेता येते. मुख्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात जाण्यासाठी वाहन पार्किंगमध्ये ठेवून काही अंतर खाली उतरावे लागते.






19,603 वेळा पाहिलं