
सध्या राज्यभरात सुरू असलेला पाऊस काही दिवस विश्रांती घेणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात १८ आणि १९ जुलै या दोन दिवसांत बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरलेला असेल. काही भागांत हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, मात्र मुसळधार पावसाची शक्यता अत्यल्प आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, २० जुल्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरणातील बदल दिसून येत आहेत. याचा परिणाम म्हणून २० जुल्यानंतर राज्यात पावसाळी ढग पुन्हा सक्रीय होतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदी-ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला, तरी अतीवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.