
वाशीम जिल्ह्यात कारंजा-सोहोळ अभयारण्य हे एक लहानसे अभयारण्य आहे. हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळविटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. वन विभाग या अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे. कारंजा-सोहोळ या अभयारण्यातज गवती माळरान आणि झुडुपी जंगल आहे. या अभयारण्यात काळवीट, नीलगाय, रानडुक्कर दिसून येते.
हे अभयारण्य कारंजापासून मानोरा रोडवर ७.४ कि. मी. अंतरावर आहे. कारंजा परिक्षेत्रातील कारंजा, गिर्डा, दादगाव व सोमठाणा नियतक्षेत्राचा 781.4 हेक्टर वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश केला आहे. या अभयारण्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. सन २००० साली या माळरानास अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. गवती माळरान या प्रकारात या अभयारण्याची गणना केली जाते.
या अभयारण्यात काळवीट, रानडुक्कर, कोल्हा, नीलगाय, रानमांजर यांचे यांचे अस्तित्व आहे. पळस, बेहडा, काटसावर, मोहा, कळंब, खैर, इत्यादी वृक्ष प्रजाती तसेच जवळपास १४५ प्रजातींचे पक्षी आपल्याला दिसून येते. या अभयारण्याला ‘गवती माळरान’ असेही ओळखले जाते.