
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून जवळ खवणे समुद्रकिनारा हा एक स्वच्छ, निळाशार समुद्रकिनारा आहे. हा किनारा डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाफ हे या किनाऱ्याचे खास आकर्षण आहे. हा समुद्रकिनारा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ज्यांना मनासाठी एकांत आणि विश्रांतीची गरज आहे, अशांसाठी हे ठिकाण अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे.
येथे जायचे झाल्यास सर्वात जवळचे विमानतळ सिंधुदुर्गातील चिपी, गोव्यातील मोपा ही आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कुडाळ आहे. अमाप निसर्गरम्यता लाभलेले, वर्दळहीन असलेले हे ठिकाण म्हणजे मनास शांती देणारे उत्तम ठिकाण आहे. मात्र येथे वर्दळ कमी असल्याने येथे जाताना आपणास हवे अलेले कोरडे खाद्यपदार्थ आपण सोबत नेलेले केव्हाही चांगले !